पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

कोरोनाचा लढा: व्हिडिओ कॉल ठरतोय बाप-लेकातील दुवा

नागपूरमधील रुग्णालयात कार्यरत डॉक्टर सुशांत मुळे यांचे कुटुंबियांचे छायाचित्र (छाया सौजन्य एएनआय)

चीनच्या वुहानमधून जगभरात पसरलेल्या कोरोना विषानणूचे देशात वेगाने संक्रमण होताना दिसत आहे. कोरोनाचे संकट परतवून लावण्यासाठी सरकार आणि प्रशासन युद्ध पातळीवर प्रयत्न करत आहेत. वैद्यकीय क्षेत्रात काम करणारी मंडळी या युद्धात फ्रंटफूटवर लढताना पाहायला मिळते. आपले कर्तव्य बजावत असताना त्यांना कुटुंबियांपासून दूर रहावे लागत आहे. कोरोना विषाणूला हरवण्यासाठी सोशल डिस्टन्सिंग या नियमाचे पालन करण्याचा सल्ला नागरिकांना दिला जात असताना वैद्यकीय क्षेत्रातील मंडळींना कुटुंबियांपासून अंतर ठेवण्याचा सल्ला दिला जात आहे. परिणामी अनेक कर्मचाऱ्यांनाआपल्या घरापासून दूर रहावे लागत आहे.

वैद्यकीय कर्मचाऱ्यांवर हल्ला करणाऱ्याला ७ वर्षांपर्यंत तुरुंगवास होणार

नागपूरमधील सरकारी वैद्यकीय महाविद्यालयातील विलगिकरण कक्षात कार्यरत असलेले डॉ. सुशांत मुळे यांच्यावरही शहरात कुटुंबिय असूनही त्यांच्यापासून अंतर ठेवून बाहेरच मुक्काम करावा लागत आहे. सुशांत मूळे यांच्या घरी वयोवृद्ध आई-वडिल त्यांच्या पत्नी श्रद्धा मुळे यांच्यासह दोन वर्षांचा मुलगा आहे. सध्याच्या घडीला कोरोना विषाणूमुळे निर्माण झालेली युद्धजन्य परिस्थितीत आपले पती कर्तव्य बजावत असल्याचा अभिमान वाटतो, असे श्रद्धा सांगतात. याकाळात आपल्या दोन वर्षांच्या मुलाची आणि वडिलांची भेट घडवून आणण्यासाठी त्यांना व्हिडिओ कॉलिंगचा सहारा घ्यावा लागत आहे.  

कोरोनाशी लढा: डॉक्टरांना मिळणार सुरक्षा, गृहमंत्र्यांचे आश्वासन

ज्यावेळी मुलगा वडिलांची आठवण काढतो त्यावेळी व्हिडिओ कॉन्फरन्सच्या माध्यमातून चिमुकल्याला वडिलांसोबत संवाद घडवून आणण्याचा प्रयत्न श्रद्धा यांना करावा लागतो. 
देशात सर्वाधिक कोरोनाग्रस्तांची संख्याही आपल्या राज्यात आहे. त्यातही  मुंबई पुणे आणि नागपूर ही शहरे हॉटस्पॉटमध्ये आहेत. कोरोनामुळे निर्माण झालेल्या संकटात डॉक्टर  सुशांत मुळे हे श्वसन चिकत्सक म्हणून सेवा बजावत आहेत. सातत्याने कोरोना रुग्णांच्या सानिध्यात असल्याने खबरदारीचा उपाय म्हणून त्यांना आपला छोटा मुलगा आणि कुटुंबियांपासून दूर रहावे लागत आहे.

  • Marathi News: संबंधित इतर बातम्या वाचण्यासाठी आम्हाला लाईक करा आणि फॉलो करा.
  • Web Title:Dr Sushant Muley he work at covid 19 ward At Nagpur when 2 years Son insists on seeing his father i connected them over Video Call says doctor wife Shraddha Muley