पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

मराठी रंगभूमीने लाडका नटसम्राट गमावला- मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

मराठी रंगभूमीने लाडका नटसम्राट गमावला

'मराठी रंगभूमीने लाडका नटसम्राट गमावला आहे. झाले बहु, होतील बहु; पण या सम हाच!', असं म्हणत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी डॉ. श्रीराम  लागू यांना श्रद्धांजली वाहिली आहे. डॉ. लागू यांचे पुण्यात मंगळवारी रात्री निधन झाले. त्यांच्या निधनानंतर कला, राजकारण, क्रीडा विश्वातून श्रद्धांजली वाहण्यात येत आहे. 

आपण महान कलाकार गमावला, नेत्यांनी नटसम्राटाला वाहिली श्रद्धांजली

डॉ. श्रीराम लागू हे उत्तम वाचक, लेखक व विचारवंत होते. सामाजिक, राजकीय विषयांवर ते आपली मते ठामपणे मांडत राहिले. मराठी रंगभूमी समृद्ध करण्यात त्यांचे योगदान मोठे होते. मराठी तसेच हिंदी चित्रपटांत त्यांनी काम केले. पण 'पिंजरा' मधील 'मास्तर' आणि 'सिंहासन' मधील 'मंत्री' त्यांनी जबरदस्त पद्धतीने उभा केला. डॉ. लागू यांना महाराष्ट्राची जनता सदैव स्मरणात ठेवील. असं म्हणत उद्धव ठाकरे यांनी ट्विटरवर लागू यांना श्रद्धांजली वाहिली. 

त्याचबरोबर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार, मनसे अध्यक्ष राज ठाकरे,  पंकजा मुंडे, नितिन गडकरीसह अनेक नेत्यांनी लागू यांना श्रद्धांजली वाहिली. 

'नागरिकत्व कायद्यासंदर्भात जनतेमध्ये संभ्रम निर्माण करण्याचा डाव'