पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

डॉ. अभय बंग यांच्या शोधग्राम प्रकल्पाला पूराचा फटका

शोधग्राम प्रकल्पाला पूराचा फटका

गडचिरोली जिल्ह्याला मुसळधार पावसाने झोडपून काढले आहे. गेल्या २४ तासापासून पडणाऱ्या मुसळधार पावसामुळे पूरस्थिती निर्माण झाली आहे. जिल्ह्यातून वाहणाऱ्या कठाणी, वैनगंगा, दिना, पोटफोडी या नद्यांना पूर आला आहे. पूराचे पाणी पुलावर आल्यामुळे अनेक मार्ग बंद झाले आहेत. गडचिरोली -नागपूर आणि गडचिरोली- हैदराबाद हे मार्ग बंद पडले आहेत. पूराचे पाणी गावामध्ये शिरल्यामुळे जनजीवन विस्कळीत होत आहे.

स्वातंत्र्यदिनी अमित शहांचा काश्मीर दौरा ठरलाय, पण... 

दरम्यान,  गडचिरोली जिल्ह्यातील धानोरा तालुक्यात डॉ. अभय बंग आणि राणी बंग या दाम्पत्याच्या सर्च संस्थेचे शोधग्राम वसलेले आहे. या शोधग्राम प्रकल्पाला पूराचा फटका बसला आहे. या संपूर्ण प्रकल्पाला पूराच्या पाण्याने वेढा घातला आहे. या शोधग्राममध्ये असलेले रस्ते, घरं पाण्याखाली गेली आहेत. घरामध्ये पाणी शिरण्यास सुरुवात झाली आहे.  या प्रकल्पाच्या आसपासची गावं देखील पाण्याखाली गेली आहे. दरम्यान, धानोरा शहराला जोडणाऱ्या मुख्य महामार्गावर देखील पाणी असल्याने वाहतूक विस्कळीत झाली आहे. 

कोल्हापूर, सांगली पूरग्रस्तांसाठी बिग बी करणार मदत