पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

अहमदनगरमध्ये भरदिवसा वकिलासह दोघांची निर्घृण हत्या

अहमदनगर हत्या प्रकरण

अहमदनगर जिल्हा दुहेरी हत्याकांडाने हादरला आहे. शेतीच्या वादातून वकील आणि त्यांच्या सहकाऱ्याची निर्घृण हत्या करण्यात आली आहे. नेवासा तालुक्यातील जेऊर हैबती या गावात ही धक्कादायक घटना घडली आहे. भरदिवसा कुऱ्हाडीने वार करुन दोघांची निर्घृण हत्या करण्यात आली आहे. त्यामुळे जेऊर हैबती गावाच एकच खळबळ उडाली आहे. 

संदीप नाईक ऐवजी गणेश नाईक ऐरोलीतून निवडणूक लढवणार
 
शेतीच्यावादातुन ज्येष्ठ वकील संभाजी ताके यांच्यासह त्यांच्या सहकाऱ्याची हत्या केली आहे. ताके कुटुंबियांसोबत अहमदनगर तालुक्यातील नागरदेवळ या गावात राहत होते. बुधवारी सकाळी ते जेऊर हैबती या मूळ गावी कामानिमित्त गेले होते. या गावामध्ये त्यांची शेती असून यावरुन वाद सुरु आहे. हे प्रकरण नेवासा न्यायालयात सुरु आहे. 

थोडं थांबा, ८ तारखेला दसरा मेळाव्यातच बोलेनः उद्धव ठाकरे

जेऊर हैबती गावातील शेताजवळ असतानाच त्यांच्यावर आणि त्यांच्या सहकाऱ्यावर कुऱ्हाडीने जीवघेणा हल्ला करण्यात आला. या हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या ताके आणि त्यांच्या सहकाऱ्याचा जागीच मृत्यू झाला. या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. दोघांचे मृतदेह शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठवण्यात आले आहेत. अहमदनगर पोलिसांकडून याप्रकरणाचा तपास सरु आहे. 

कोर्टवरील बॉल गर्लला 'हॉट' म्हटल्याने पंचावर बंदीची कारवाई