भाजप आणि शिवसेना युतीबद्दल कोणतीही विधाने करू नका. विशेषतः मुख्यमंत्रीपदाबद्दल काहीच बोलू नका, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी विधीमंडळाच्या दोन्ही सभागृहांतील सदस्यांना सांगितले. या दोन्ही नेत्यांनी एकत्रितपणे सोमवारी विधानभवनात आमदारांची 'शाळा' घेतली. त्यावेळी त्यांनी युती भक्कम असल्याचे पुन्हा एकदा सगळ्यांसमोर सांगितले.
राज्यसभा पोटनिवडणूक: गुजरातमधील काँग्रेस नेत्यांची याचिका फेटाळली
लोकसभा निवडणुकीतील विजयामुळे विधानसभा निवडणुकीत निर्धास्त राहू नका. आतापासूनच निवडणुकीच्या कामाला लागा, असे या दोघांनीही यावेळी सांगितले. विधानभवनामध्ये सुमारे २० मिनिटे या दोघांनी मिळून आमदारांशी संवाद साधला. भाजप आणि शिवसेना युती, त्याचबरोबर मुख्यमंत्रीपदावरून माध्यमांमध्ये येत असलेल्या बातम्या या सगळ्यांबद्दल देवेंद्र फडणवीस आणि उद्धव ठाकरे यांनी स्पष्टपणे आपली भूमिका मांडली.
या बैठकीला उपस्थित असलेल्या शिवसेनेच्या एका मंत्र्यांने सांगितले की, युतीबद्दल त्याचबरोबर जागा वाटपाबद्दल कोणीही काहीही बोलू नका, असे या दोघांनी आमदारांना सांगितले. मुख्यमंत्री, उद्धव ठाकरे आणि अमित शहा हे तिघे मिळूनच या संदर्भातील निर्णय घेणार आहेत.
पुणेः शेतजमिनीवर धुडगूस; कर्नलसह ४० जवानांवर गुन्हा दाखल
राज्यातील मंत्री चंद्रकांत पाटील, गिरीश महाजन आणि सुधीर मुनगंटीवार हे पुढील मुख्यमंत्री भाजपचाच असणार असे सांगत आहेत. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार गिरीश महाजन यांच्या वक्तव्यामुळे खुद्द उद्धव ठाकरे नाराज झाले आहेत. त्यामुळे सोमवारी गिरीश महाजन यांनी उद्धव ठाकरे यांची भेट घेऊन घडल्याप्रकाराबद्दल माफीही मागितली, असे समजते.