पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

हिंदुंच्या सहिष्णुतेला कमजोरी समजण्याची चूक करु नका : फडणवीस

देवेंद्र फडणवीस

राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि विद्यमान विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी एमआयमचे नेते वारिस पठाण यांच्या वादग्रस्त वक्तव्यावर प्रतिक्रिया दिली आहे. बहुसंख्यक समुदायाच्या सहिष्णुतेला कमजोरी समजू नका, अशा शब्दांत त्यांनी वारिस पठाण यांना प्रत्युत्तर दिले आहे. 

वारिस पठाणांविरोधात पक्षाची कारवाई, माध्यमांशी बोलण्यास घातली बंदी

कर्नाटकमधील गुलबर्गा येथील सुधारित नागरिकत्व कायद्याच्या विरोधातील एका सभेतील भाषणात वारिस पठाण यांनी १५ कोटी मुस्लीम १०० कोटी हिंदूवर भारी पडतील, असे वक्तव्य केले होते. त्यांच्या या वक्तव्यामुळे चांगलाच वाद निर्माण झाला होता. वारिस पठाण यांचे वक्तव्य दोन्ही धर्मात तेढ निर्माण करणारे असल्याच्या प्रतिक्रिया उमटल्या होत्या. याप्रकरणी एमआएमचे अध्यक्ष असदुद्दीन ओवेसी यांनी वारिस पठाण यांना पुढील आदेशापर्यंत प्रसार माध्यमांशी बोलण्यास बंदी घातली आहे. 

डोनाल्ड ट्रम्प लेकीसह भारत दौऱ्यावर येणार

नागपूरमध्ये प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना फडणवीसांनी वारिस पठाण यांच्या वक्तव्यावर भाष्य केले. वारिस पठाण यांनी वक्तव्यासंदर्भात माफी मागायला हवी. जर ते माफी मागत नसतील तर  ठाकरे सरकारने त्यांच्यावर कारवाई करावी, असे फडणवीस यांनी म्हटले आहे. ते पुढे म्हणाले, १०० कोटी हिंदूच्या देशात अल्पसंख्यांक  सुरक्षित आहेत हे वारिस यांनी समजून घ्यावे, मुस्लीम बहुल राष्ट्रात जर कोणीही अशा प्रकारचे वक्तव्य करण्याचे धाडस केले नसते. हिंदू सहिष्णू आहेत पंरतु या सहिष्णुतेला कमजोरी समजण्याची चूक करु नका. पठाण यांनी राष्ट्राची आणि हिंदू समूहाची माफी मागावी, यावर त्यांनी जोर दिला आहे.  
 

  • Marathi News: संबंधित इतर बातम्या वाचण्यासाठी आम्हाला लाईक करा आणि फॉलो करा.
  • Web Title:Don t Mistake Hindu Tolerance for Weakness says Devendra Fadnavis Devendra FadnavisFadnavisWaris Pathan