पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

जळगावात तरुण डॉक्टरची गळफास घेऊन आत्महत्या

आत्महत्या (प्रतिकात्मक छायाचित्र)

जळगाव शहरातील रिंगरोड येथील हरेश्वरनगरात राहणाऱ्या एका तरुण डॉक्टरने गळफास घेऊन आत्महत्या केली. बुधवारी रात्री साडेसात वाजता ही घटना उघडकीस आली. कानात इअरफोन लावून कोणाशी तरी बोलत असताना डॉक्टरने आत्महत्या केल्याचे प्राथमिक तपासात समोर आले आहे. जिल्हा पेठ पोलिस ठाण्यात घटनेची नोंद झाली असून पोलिस पुढील तपास करत आहेत. 

ट्रम्प यांना झोपड्या दिसू नयेत म्हणून भिंत बांधण्याची लगबग

विजय नारायण जाधव (वय २४, मूळ रा.बोरगाव कसारी, ता. सिल्लोड, औरंगाबाद) असे मृत डॉक्टरचे नाव आहे. जाधव हे अविवाहित असून, साकेगाव येथील होमिओपॅथी महाविद्यालयात प्रशिक्षणार्थी डॉक्टर म्हणून काम करत होते. त्यांच्या मागे आई, वडील व भाऊ असा परिवार आहे. वडील व भाऊ हे दोघे शिक्षक आहेत. 

'बेबी मफलरमॅन'ला शपथविधीसाठी आग्रहाचं आमंत्रण

गेल्या चार वर्षांपासून डॉ.जाधव हे हरेश्वरनगर येथे राहत होते. बुधवारी ते खोलीत मोबाइलवर इअरफोन लावून बोलत असताना अचानक त्यांनी गळफास घेऊन आत्महत्या केली. यानंतर अर्ध्या तासात त्यांचे मित्र डॉ. गिरीश पाटील हे घरी गेले असता डॉ.जाधव दरवाजा उघडत नव्हते. तसेच मोबाइलदेखील उचलत नसल्यामुळे डॉ. पाटील यांनी खिडकीतून डोकावून पाहिले असता डॉ. जाधव यांनी गळफास घेतल्याचे दिसून आले. आत्महत्येचे कारण अद्याप स्पष्ट झाले नसून चौकशीसाठी त्यांचा मोबाइल पोलिसांनी जप्त केला. खोलीतून कुठलीही संशयित वस्तू आढळून आली नाही.

यंदाच्या आयपीएलमध्ये रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु दिसणार नाही, तर...