पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

कुठलेही बटण दाबा, मत कमळालाच; साताऱ्यात प्रकार घडल्याचे माध्यमांचे वृत्त

लोकसभा निवडणूक निकालाच्या अधिकृत घोषणेसाठी विलंब होणार आहे.

सातारा जिल्ह्यातील कोरेगाव मतदारसंघातील नवलेवाडीमध्ये काही मतदारांनी ज्या पक्षाला मत दिले आहे त्याच्याऐवजी ईव्हीएममध्ये कमळाला मत दिले गेल्याची तक्रार सोमवारी सकाळी करण्यात आली. त्यानंतर या मतदान केंद्रावरील संबंधित ईव्हीएम बदलण्यात आल्याची माहिती मिळते आहे. 'एबीपी माझा' वृत्तवाहिनीने या संदर्भातील वृत्त दिले आहे.

तेजस एक्स्प्रेसमधील प्रवाशांच्या चाळ्यांनी हॉस्टेस वैतागल्या

या वृत्तानुसार, सोमवारी सकाळी खटाव तालुक्यातील नवलेवाडी मतदान केंद्रावर ईव्हीएममध्ये कोणत्याही उमेदवारापुढील चिन्हाचे बटण दाबल्यावर ते मत कमळ चिन्हाला जात असल्याची तक्रार ग्रामस्थांनी मतदान केंद्रप्रमुखांकडे केली. हा प्रकार समोर आल्यावर काहीवेळ मतदान केंद्रावर गोंधळाची स्थिती निर्माण झाली होती. पण ग्रामस्थांनी शंका घेतल्यावर मतदान केंद्रावरील संबंधित ईव्हीएम बदलण्यात आले. सकाळी अकराच्या सुमारास संबंधित ईव्हीएम बदलून तिथे नवे ईव्हीएम बसविण्यात आल्याचे या वृत्तात म्हटले आहे. 

INX मीडिया प्रकरणात चिदंबरम यांना जामीन, पण तूर्त सुटका नाही

दरम्यान, या संदर्भात या मतदारसंघातील निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी अधिकृतपणे काहीही माहिती दिलेली नाही.