पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

खातेवाटपानंतर मंत्र्यांच्या नाराजीत वाढ, मिळालेल्या खात्यावरून असमाधान

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार

राज्यातील महाविकास आघाडी सरकारचे खातेवाटप जाहीर झाल्यानंतरही सर्वकाही आलबेल असल्याची स्थिती नाही. विविध मंत्र्यांनी त्यांना मिळालेल्या खात्यांबद्दल नाराजी व्यक्त केली आहे. आणि ही स्थिती महाविकास आघाडीतील सर्वच पक्षांमध्ये अर्थात शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये आहे. 

मुंबईत कफ परेडजवळ किनाऱ्यावर दिसतंय काळ्या रंगाचं पाणी!

महाविकास आघाडी सरकारचे सविस्तर खातेवाटप रविवारी जाहीर झाले. या खातेवाटपात राष्ट्रवादी काँग्रेसच्या वाट्याला सर्व महत्त्वाची खाती गेली आहेत. आपल्याला महत्त्वाची खाती मिळाली नाहीत म्हणून काँग्रेसचे काही मंत्री नाराज आहेत. दुसरीकडे मंत्रिमंडळात समावेशच न झाल्यामुळे शिवसेनेतील काही नेते नाराज आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये तर शेवटच्या क्षणापर्यंत महत्त्वाचे खाते आपल्याच पारड्यात पाडून घेण्यासाठी लॉबिंग सुरू होती.

मिळालेल्या माहितीनुसार, काँग्रेसला कृषी खाते हवे होते. पण ते त्यांना मिळाले नाही. त्यांच्याकडे तुलनेत दुय्यम तीन खाती देण्यात आली आहेत. यामुळे आता काँग्रेसच्या नेत्यांकडून त्यांच्या राज्यातील नेतृत्त्वावर टीका केली जाते आहे. वाटाघाटींसाठी गेलेल्या काँग्रेसच्या नेत्यांवर यामुळे टीका केली जाते आहे.

काँग्रेसचे नितीन राऊत यांच्याकडे ऊर्जा तर विजय वडेट्टीवर यांना इतर मागासवर्गाचे खाते देण्यात आले आहे. राऊत यांना सार्वजनिक बांधकाम खाते हवे होते. पण त्यांना ते मिळाले नाही. अद्याप उघडपणे या दोघांनी नाराजी व्यक्त केलेली नाही. पण ते फार आनंदी नाहीत, असे एका काँग्रेस नेत्याने सांगितले.

जेएनयू हिंसाचारः मुंबईत मध्यरात्रीपासून विद्यार्थ्यांचे आंदोलन

शिवसेनेचे सुनील राऊत आणि भास्कर जाधव हे मंत्रिमंडळात स्थान न मिळाल्याने नाराज आहेत. त्यांनी आपली नाराजी बोलूनही दाखवली आहे. अब्दुल सत्तार यांनीही शनिवारी राजीनामा दिल्याचे वृत्त आले होते. पण ते नाराज असले तरी राजीनामा दिलेला नाही, असे शिवसेनेचे अर्जुन खोतकर यांनी त्या दिवशी स्पष्ट केले. अब्दुल सत्तार यांनी रविवारी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेतली होती.