पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

चितळे उद्योग समुहाचे संचालक काकासाहेब चितळे यांचे निधन

काकासाहेब चितळे यांचे निधन

प्रसिद्ध उद्योगपती आणि चितळे उद्योग समुहाचे संचालक काकासाहेब चितळे यांचे निधन झाले आहे. मिरज येथे हृयविकाराच्या झटक्याने त्यांचे निधन झाले आहे. काकासाहेब चितळे यांनी वयाच्या ७९ व्या वर्षी  अखेरचा श्वास घेतला. त्यांच्यावर मिरज येथील एका खासगी रुग्णालयात उपचार सुरु होते.  

हर्षवर्धन जाधव यांची घरवापसी; राज ठाकरेंच्या उपस्थितीत 'मनसे'प्रवेश

शुक्रवारी रात्री प्रकृतीमध्ये बिघाड झाल्यामुळे काकासाहेब चितळे यांना मिरज येथील खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. उपचार सुरू असताना शनिवारी दुपारी साडे तीनच्या सुमारास हृदयविकाराच्या झटक्याने त्यांचे निधन झाले. काकासाहेब चितळे यांच्या पाश्चात पत्नी सुनिता चितळे, दोन मुलं उद्योगपती गिरीश चितळे आणि मकरंद चितळे, मुलगी वीणा सहस्त्रबुद्धे, सूना आणि नातवंडे असा परिवार आहे. 

'माझ्या सिक्स्थ सेन्सनुसार दिल्लीत भाजप ५० पेक्षा जास्त

सांगली जिल्ह्यातील भिलवडी येथे काकासाहेब चितळे यांचे मूळगाव आहे. याठिकाणावरुनच चितळे बंधूनी आपल्या उद्योग समूहाची सुरुवात केली. मॅकेनिकल इंजिनिअरिंगचे शिक्षण घेतल्यानंतर काकासाहेब चितळे वडील बाबासाहेब चितळे आणि भावंडांसोबत चितळे उद्योग समूहामध्ये कार्यरत राहिले. चितळे उद्योग समुहाचे दूध, दुग्धजन्य पदार्थ आणि बाकरवाडी हे प्रसिद्ध उत्पादने आहेत.

ऊसतोड कामगारांना घेऊन जाणाऱ्या ट्रॅक्टरला अपघात; ७ जण ठार