पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

नागपूर-अमरावती महामार्गावर अपघात, टँकर जळून खाक!

नागपूर-अमरावती महामार्गावर अपघात

नागपूर-अमरावती महामार्गावरील कोंढाळी गावाजवळ डिझेल भरून जाणाऱ्या टॅंकरचा अपघात झाला. टायर फुटल्याने टँकर चालकाता ताबा सुटला. त्यानंतर टँकर पुलाला धडकून पलटी झाला. यानंतर संपूर्ण टॅंकरला आग लागल्याची घटना घडली. यात टँकर जळून खाक झाला असून एकाचा मृत्यू झाल्याचे वृत्त आहे. रविवारी दुपारी पावणे तीनच्या सुमारास हा अपघात घडला. 

सोलापूर-अक्कलकोट रस्त्यावर कार-ट्रकचा अपघात, तिघांचा जागीच मृत्यू

अपघातामुळे दोन्ही बाजूची मोठी वाहतूक कोंडी झाली होती. या अपघातात मृत झालेल्या व्यक्तीची ओळख अद्याप पटलेली नाही. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत टँकरची आग विझवली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अपघातनंतर काही क्षणातच टॅंकरने पेट घेतली.आग मोठ्या प्रमाणात लागल्याने त्याच्या जवळ जाण्याचे धाड कोणी करु शकले नाही. हा टँकर पूर्णपणे जळून खाक झाला असून टँकरचा क्रमांक आणि कंपनी देखील समजू शकलेली नाही. यासंदर्भात कोंढाळी पोलीस तपास करत आहेत.