पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

धर्मकारण अन् राजकारण वेगळे हिच आमची श्रद्धा : धनंजय मुंडे

धनंजय मुंडे यांनी भगवानगडावर जाऊन भगवान बाबांच्या समाधीचे दर्शन घेतले

बीड विधानसभा मतदार संघातील संघर्षमय लढतीत विजय मिळवून सामाजिक न्यायमंत्रिपदी वर्णी लागलेल्या राष्ट्रवादीच्या धनंजय मुंडे यांनी गुरुवारी भगवानगडावर जाऊन भगवान बाबांच्या समाधीचे दर्शन घेतले. ज्या गडावर माझ्यावर दगडफेक करण्यात आली  तिथेच आज भगवान बाबांनी मला न्याय दिला, अशी भावना धनंजय मुंडे यांनी गडावर गेल्यानंतर व्यक्त केली. महाराजांनीच मला गडावर येण्याची आज्ञा केली होती. माझ्या आयुष्यातील हा सुवर्ण अक्षराने लिहावा असा क्षण असल्याचंही ते म्हणाले.

... म्हणून साहित्य संमेलनाला जाऊ नका, मराठी साहित्यिकाला पत्र

धनंजय मुंडे यांनी फेसबुकच्या माध्यमातून आपल्या मनातील भावना व्यक्त केल्या आहेत. राज्याचा मंत्री म्हणून काम करण्याची ज्यावेळी संधी मिळेल त्यावेळी भगवानगडावर येऊन भगवानबाबांचे दर्शन घ्यावे अशी आज्ञा गडाचे मठाधिपती शास्त्री महाराजांनी मुंबई येथे येऊन दिली होती. शास्त्री महाराजांची आज्ञा पाळत आज भगवानगडावर जाऊन बाबांचे दर्शन घेतले. माझ्यासाठी हा सुवर्ण अक्षरांनी लिहण्यासारखा दिवस आहे. विरोधी पक्षनेता म्हणून गडावर दर्शनासाठी आलो होतो तेव्हा काही जणांनी माझ्या गाडीवर दगडफेक केली होती. पण आज मला इथे दर्शनाची संधी मिळाली, भगवान बाबांनी न्याय दिला! सामान्य जनतेची, गोरगरिबांची सेवा करण्याची शक्ती मला मिळो असा आशिर्वाद भगवान बाबाकडे मागितला, अशी पोस्ट लिहून त्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. 

भाजप-मनसे यांच्यातील युतीसंदर्भात फडणवीस म्हणाले की...

२०१५ मध्ये भगवानगडाच्या सुवर्ण महोत्सवी सप्ताह कार्यक्रमाला भगवान बाबांच्या दर्शनासाठी गेलेल्या धनंजय मुंडे यांना प्रचंड विरोध झाला होता. संतप्त जमावाने केलेल्या दगडफेकीनंतर त्यांना दर्शन न घेताच मागे परतावे लागले होते. याप्रकारानंतर गडाचे महंत नामदेव शास्त्री यांनी धनंजय मुंडे यांना मंत्री होऊन गडावर या असं निमंत्रण दिलं होतं. त्यानुसार धनंजय मुंडे यांनी गडावर जाऊन भगवान बाबांच्या समाधीचं दर्शन घेतलं. मंत्रिपदासोबतच बीडचे पालकमंत्रिपदाची जबाबदारी देखील मुंडेकडे आहे.