पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

धनंजय मुंडे यांची बुलेटवरून प्रचारफेरी!

धनंजय मुंडे

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी सोमवारी बीडमध्ये बुलेटवरून काढलेली प्रचारफेरी चर्चेचा विषय ठरली होती. 

बीड लोकसभेचे काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीचे उमेदवार बजरंग सोनवणे यांच्या प्रचारासाठी सोमवारी मुंडे यांनी तालुक्यातील राडी येथे प्रचारसभेला जाताना अंबाजोगाई कारखान्यापासून युवक कार्यकर्त्यांसोबत मोटार सायकल रॅलीचे आयोजन केले होते. 

रॅलीत युवकांमध्ये क्रेझ असलेल्या बुलेटची संख्या मोठ्या प्रमाणावर होती. धनंजय मुंडे यांचेही बुलेटप्रेम सर्वश्रुत असल्यामुळे रॅलीची सुरूवात होताच त्यांनाही बुलेटवर बसण्याचा मोह आवरता आला नाही आणि त्यांनी चक्क एका कार्यकर्त्याची बुलेट आपल्या हाती घेत रॅलीचे नेतृत्व केले.

धनंजय मुंडे स्वतःच रॅलीत उतरल्याने कार्यकर्त्यांचा उत्साह दुपटीने वाढला. राडीपर्यंत बुलेट चालवून रस्त्यावरील मतदारांना धनंजय मुंडे यांनी सोनवणे यांना विजयी करण्याचे आवाहनही केले. धनंजय मुंडे यांच्या बुलेट रॅलीची मतदारसंघात चर्चा होती.