पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

देवेंद्र फडणवीस यांचा उमेदवारी अर्ज दाखल, नागपुरात भाजपचे शक्तिप्रदर्शन

देवेंद्र फडणवीस यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नागपूर दक्षिण-पश्चिम मतदारसंघातून आपला उमेदवारी अर्ज शुक्रवारी दुपारी दाखल केला. यापूर्वी भाजपने शुक्रवारी सकाळी नागपूरमध्ये मोठे शक्तिप्रदर्शन केल्याचे पाहायला मिळते आहे. नागपूरमधील संविधान चौकातून रॅलीकाढून देवेंद्र फडणवीस उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी आले होते. हजारो कार्यकर्ते या रॅलीत सहभागी झाले होते. केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक मंत्री नितीन गडकरी, प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्यासह भाजपचे अनेक नेते या रॅलीमध्ये सहभागी झाले होते.

भाजपची चौथी यादी जाहीर; विनोद तावडे, राज पुरोहित यांना धक्का

उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा शुक्रवारी शेवटचा दिवस आहे. त्यामुळे राज्यात सर्वच ठिकाणी आज मोठ्या प्रमाणात उमेदवारी अर्ज दाखल होणार आहेत. नागपूरमध्ये सर्वांचे लक्ष देवेंद्र फडणवीस यांच्या उमेदवारी अर्ज भरण्याकडे लागले होते.

देवेंद्र फडणवीस शुक्रवारी सकाळी सपत्नीक नितीन गडकरी यांच्या घरी गेले. यावेळी चंद्रकांत पाटील, महाराष्ट्राचे प्रभारी भूपेंद्र यादव हे सुद्धा उपस्थित होते. नितीन गडकरी यांच्या पत्नीने देवेंद्र फडणवीस यांच्यासह सर्वांचे यावेळी औक्षण केले. त्यानंतर संविधान चौकात भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला हार घालून अभिवादन करण्यात आले आणि रॅलीला सुरुवात झाली.

महाराष्ट्रात काँग्रेसच्या प्रचारासाठी राहुल गांधींचा मोठा प्लॅन

देवेंद्र फडणवीस यांच्याविरोधात काँग्रेस आघाडीने आशिष देशमुख यांना निवडणुकीच्या रिंगणात उतरविले आहे.