पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

दुसऱ्याच्या घरी मुलगा झाला अन् हे पेढे वाटत फिरुन राहिले : फडणवीस

देवेंद्र फडणवीस

राज्यात नुकत्याच पार पडलेल्या जिल्हापरिषदेच्या निकालानंतर गुरुवारी मुंबईत भाजपची चिंतन बैठक पार पडली. या बैठकीनंतर प्रसारमाध्यमांशी बोलताना माजी मुख्यमंत्री आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी महाआघाडी सरकारवर शाब्दिक तोफ डागली. याशिवाय त्यांनी भाजप आणि मनसे यांच्यातील युतीसंदर्भातील चर्चेवर सविस्तर भूमिका मांडली.  

धर्मकारण अन् राजकारण वेगळे हिच आमची श्रद्धा : धनंजय मुंडे

नागपूरमध्ये मागच्या निवडणुकीमध्ये आम्ही शिवसेनेसोबत निवडणुका लढवल्या होत्या. त्यावेळी आम्हाला २१ जागा आणि शिवसेनेला ८ जागा होत्या. यावेळी आमच्या ६ जागा कमी झाल्या. पण शिवेसेनेच्या ७ जागा कमी झाल्या आहेत. त्यांना केवळ १ जागा मिळाली आहे. विधानसभा निवडणुकीतही आम्हाला नागपूर जिल्ह्यात ६ पैकी केवळ २ जागा मिळवण्यात यश आले होते. याचा फटका नागपूर जिल्हापरिषदेच्या निवडणुकीत बसला हे खरे असले तरी हा पराभव फार मोठा नाही, असे फडणवीसांनी म्हटले आहे.   

विनयभंग प्रकरणात मुख्यमंत्र्यांच्या ड्रायव्हरचे निलंबन

दुसऱ्याच्या घरात मुलगा झालं की हे पेढे वाटत फिरुन राहिले, अशा शब्दांत त्यांनी शिवसेना-काँग्रेस आणि राष्ट्रवादीवर निशाणा साधला. या तिन्ही पक्षांपेक्षा भाजप भारी आहे. विधानसभेत एकट्या भाजपला १०३ जागा मिळाल्या आहेत. त्यामुळे त्यांनी   पेढे वाटायचे बंद करावे, असा टोला फडणवीसांनी महाआघाडीत सामील असलेल्या शिवसेना-काँग्रेस आणि राष्ट्रवादीला लगावला. 

पुण्यातील मनसे कार्यालयाला 'भगवा' साज

यावेळी त्यांनी भाजप आणि मनसे एकत्र येण्याबाबत कोणतीही चर्चा झाले नसल्याचे पुन्हा एकदा स्पष्ट केले. मनसेनी आपला विचार आणि कार्यपद्धती बदलली तर ते आमच्यासोबत येऊ शकतात. आजचा त्यांचा विचार व्यापक नाही. भाजप हा राष्ट्रीय पक्ष आहे. सर्व समाजाचे, जातीचे आणि सर्व भाषिक लोक आमच