वांद्रे येथे मंगळवारी झालेल्या प्रकाराबाबत भाजपचे नेते आणि माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्य सरकारवर जोरदार टीका केली आहे. वांद्रे येथे घडलेल्या घटनेबाबत आपली जबाबदारी झटकून राज्य सरकार केंद्र सरकारवर टीका करून पळ काढत असेल तर ते अत्यंत दुर्दैवी आहे, अशी टीका देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे. त्यांनी ट्विट करत राज्य सरकारवर निशाणा साधला आहे.
बांद्य्रामध्ये हजारो मजूर रस्त्यावर उतरणे, ही अतिशय गंभीर घटना आहे.
— Devendra Fadnavis (@Dev_Fadnavis) April 14, 2020
हे चित्र मनाला व्यथित करणारे आहे.
परराज्यातील मजुरांची व्यवस्था करणे, त्यांना योग्य जेवण, सुविधा देणे, ही राज्य सरकारची जबाबदारी आहे.#bandrastation #Mumbai pic.twitter.com/c856TyrRLi
COVID -19: एकट्या मुंबईत १७५३ कोरोनाबाधित, २०४ नव्या रुग्णात भर
फडणवीस यांनी सांगितले की, वांद्र्यामध्ये हजारो मजूर रस्त्यावर उतरणे, ही अतिशय गंभीर घटना आहे. हे चित्र मनाला व्यथित करणारे आहे. परराज्यातील मजुरांची व्यवस्था करणे, त्यांना योग्य जेवण, सुविधा देणे, ही राज्य सरकारची जबाबदारी आहे. मात्र सरकारकडून तसे होताना दिसत नाही. सरकारने यातून धडा घ्यायला हवा, अशी टीका फडणवीसांनी केली आहे.
'कोरोनाविरोधातील लढ्यासाठी आतापर्यंत२१ हजार योद्ध्यांनी दर्शवली तयारी'
अशा परिस्थितीतही आपली जबाबदारी झटकून केंद्र सरकारवर टीका करून पळ काढला जात असेल तर ते आणखी दुर्दैवी आहे, अशी टीका फडणवीसांनी केली आहे. तसंच, कोरोनाविरूद्धचा लढा हा राजकीय नाही, हे कृपया आतातरी लक्षात घ्या. हा लढा आपल्याला गांभीर्यानेच लढावा लागेल, ही पुन्हा एकदा माझी कळकळीची विनंती आहे, असे फडणवीसांनी सांगितले.
वांद्र्यात लॉकडाऊनचे उल्लंघन, घरी जाण्यासाठी मजुरांची स्टेशनवर गर्दी