मंत्रिमंडळाच्या खातेवाटपापूर्वीच नाराजीमुळे शिवसेनेचे नेते अब्दुल सत्तार यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिल्याचे वृत्त आहे. पण त्यांना कॅबिनेट मंत्रिपद हवे असताना राज्यमंत्रिपद देण्यात आल्यामुळे ते नाराज असल्याचे सांगण्यात येते. परंतु, सत्ताधाऱ्यांवर टीका करण्याची एकही संधी न सोडणाऱ्या भाजपने पुन्हा एकदा शिवसेनेवर निशाणा साधला आहे. सत्तार यांचा राजीनामा हा उद्धव ठाकरे सरकारच्या पतनाची सुरुवात असल्याची टीका माजी मुख्यमंत्री तथा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केली. सत्तार यांनी ३० डिसेंबर रोजी झालेल्या मंत्रिमंडळ विस्तारावेळी शपथ घेतली होती.
बोहल्यावर चढण्याआधीच नवरदेव पळाला, बापटांची खोचक प्रतिक्रिया
सर्वच मंत्र्यांना मलाईदार मंत्रालय पाहिजे. त्यासाठी सगळ्यांचा संघर्ष सुरु आहे. कोणालाही कृषी खाते नकोय. प्रत्येकाला चांगली खाती हवीत. विशेष म्हणजे अजूनही खातेवाटप झालेले नाही. हे विश्वासघाताचे सरकार, असल्याचा आरोप फडणवीस यांनी केला.
दरम्यान, महाविकास आघाडी सरकारचे खातेवाटप जाहीर होण्याला उशीर का होतोय, हे मला माहिती नाही. मुख्यमंत्री उद्धव ठाकरेच याबद्दल सांगू शकतील, अशी प्रतिक्रिया शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत यांनी दिली आहे. एबीपी माझा वाहिनीशी बोलताना त्यांनी ही प्रतिक्रिया दिली. त्याचबरोबर अब्दुल सत्तार यांनी राजीनामा का दिला हे सुद्धा मला माहिती नाही, असे त्यांनी स्पष्ट केले.
एकर आणि हेक्टर यातील फरक कळतो का? चंद्रकांत पाटलांचा CM ठाकरेंना टोला
तर दुसरीकडे पुण्याचे खासदार आणि भाजप नेते गिरीष बापट यांनीही यावर टीका केली आहे. हे म्हणजे बोहल्यावर चढण्याआधीच नवरदेवाने पळून जाण्यासारखी स्थिती असल्याचा टोला त्यांनी लगावला.