पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

भाजप-मनसे यांच्यातील युतीसंदर्भात फडणवीस म्हणाले की...

माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

भाजप आणि मनसे यांच्यातील युतीसंदर्भातील चर्चेवर माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिली आहे. सध्याच्या घडीला मनसेसोबत युती होणे अशक्य आहे. पण भविष्यात समीकरणे जुळून आली तर यावर विचार होऊ शकतो, असे फडणवीस यांनी म्हटले आहे. लोकम समूहाच्या एका कार्यक्रमामध्ये देवेंद्र फडणवीसांना राज ठाकरे यांच्यासोबतच्या भेटीसंदर्भात प्रश्न विचारण्यात आला होता. त्यावेळी त्यांनी मनसे आणि भाजप यांच्यातील युतीसंदर्भात भाष्य केले. राज ठाकरे यांची अनेकदा भेट घेतली आहे, असे म्हणत त्यांनी नुकत्याच राज ठाकरेंसोबत झालेल्या भेटीसंदर्भातील बोलणे टाळले. 

राजकीय वर्तुळात फडणवीस अन् दुसऱ्या ठाकरेंच्या भेटीची चर्चा!

देवेंद्र फडणवीस म्हणाले की, राज ठाकरेंची अनेकदा भेट घेतली आहे. मनसेचा विचार आणि कार्यपद्धती आमच्यापेक्षा खूप वेगळी आहे. त्यामुळे सध्याच्या घडाली भाजप-मनसे एकत्र येऊ शकत नाही. भविष्यात मनसेने व्यापकरित्या कार्यपद्धतीत बदल केला, तर याबाबत विचार होऊ शकतो, असे सांगत त्यांनी महाराष्ट्राच्या राजकारणात भाजप-मनसे समीकरण जुळण्याचा पर्याय खुला असल्याचेही संकेत दिले. 

पाच वर्षांत फडणवीसांनी महाराष्ट्र ओरबाडून टाकला, अनिल गोटेंचा आरोप

माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि राज ठाकरे यांच्या भेटीची चर्चा राजकीय वर्तुळात चांगलीच रंगली होती.  दोन्ही नेत्यांमध्ये जवळपास दीड तास चर्चा झाल्याचे बोलले जात होते. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी भाजपची साथ सोडल्यानंतर त्यांचे बंधू आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे भाजपसोबत घरोबा करणार असल्याची चर्चा या भेटीनंतर जोर धरु लागली होती. २३ जानेवारीला मुंबईतील महामेळाव्यात मनसे अध्यक्ष राज ठाकरे यावर प्रतिक्रिया देणार की त्यापूर्वी काही माहिती समोर येणार याची उत्सुकता असताना फडणवीसांनी यावर प्रतिक्रिया दिली आहे.