पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

फडणवीसांनी आजच राजीनामा दिला पाहिजे, विरोधकांची मागणी

पृथ्वीराज चव्हाण

महाराष्ट्रातील राजकीय स्थितीवर सर्वोच्च न्यायालयाने मंगळवारी दिलेल्या निकालाचे काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना या तिन्ही पक्षांनी स्वागत केले आहे. त्याचवेळी माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी देवेंद्र फडणवीस यांनी आजच आपल्या मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिला पाहिजे, अशी मागणी केली. सत्याचा कायम विजयच होत असतो. त्याचा कधीही पराभव केला जाऊ शकत नाही, असे शिवसेनेने आपली प्रतिक्रिया देताना म्हटले आहे. 

हंगामी अध्यक्ष कोण? कोळंबकर, पाचपुते की बागडे...

महाराष्ट्र विधानसभेत बुधवारी पाचच्या आत बहुमत चाचणी घेतली जावी. त्यासाठी हंगामी अध्यंक्षांची नियुक्ती केली जावी. त्यांनीच दिवसभरात सर्व सदस्यांना गोपनीयतेची शपथ द्यावी आणि त्यानंतर विश्वासदर्शक ठरावावर मतदान घेतले जावे, असे न्यायालयाने म्हटले आहे. 

सर्वोच्च न्यायालयाच्या निकालानंतर शिवसेनेचे गटनेते एकनाथ शिंदे यांनीही देवेंद्र फडणवीस यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे. लपून छपून स्थापन झालेल्या सरकारला सत्तेवर राहण्याचा कोणताही अधिकार नाही. त्यांच्याकडे बहुमताचा आकडा नाही. आमच्याकडे १७० आमदारांचे पाठबळ आहे, असे एकनाथ शिंदे यांनी म्हटले आहे. 

विश्वासदर्शक ठरावावर बुधवारी पाचच्या आत मतदान घ्या - सुप्रीम कोर्ट

आमच्याकडे बहुमत आहे. त्यामुळे भाजप बुधवारी विधानसभेत नक्कीच उघडा पडेल. आज देशभरात संविधान दिवस साजरा होत असतानच आलेला हा निकाल निश्चितपणे समाधानकारक आणि दिलासा देणारा असल्याचे पृथ्वीराज चव्हाण यांनी म्हटले आहे.