पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

लोकसभा निकालानंतर राज्य मंत्रिमंडळाच्या विस्ताराच्या हालचाली, यांना मिळणार संधी

महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

विधानसभा निवडणूक अवघ्या पाच महिन्यांवर आली असतानाही लोकसभा निवडणुकीचे निकाल जाहीर झाल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मंत्रिमंडळाचा विस्तार होण्याच्या हालचाली सध्या सुरू झाल्या आहेत. एका ज्येष्ठ मंत्र्याने 'हिंदूस्थान टाइम्स'ला ही माहिती दिली. सध्या काँग्रेसवासी पण भाजपच्या वाटेवर असलेले राधाकृष्ण विखे पाटील, राष्ट्रवादी काँग्रेसला रामराम ठोकणारे विजयसिंह मोहिते पाटील, त्याचबरोबर बीडमधील नेते जयदत्त क्षीरसागर यांना राज्य मंत्रिमंडळात घेण्याचे ठरल्यास मंत्रिमंडळाचा विस्तार केला जाऊ शकतो. त्याचबरोबर मंत्रिमंडळात अन्य बदलही केले जातील.

लोकसभा निवडणुकीमध्ये राधाकृष्ण विखे पाटील यांचा मुलगा सुजय यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. त्यांना पक्षाने नगर लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी दिली होती. तर विजयसिंह मोहिते पाटील यांचा मुलगा रणजितसिंह मोहिते पाटील यांनीही भाजपमध्ये प्रवेश केला आहे. त्याचवेळी लोकसभा निवडणुकीच्या काळात जयदत्त क्षीरसागर यांनी उघडपणे भाजपचा प्रचार केला होता. त्यामुळे यांना संधी मिळू शकते, असे सांगितले जात आहे.

महाराष्ट्र लोकसभा निकाल अंदाज : या आहेत तीन शक्यता

लोकसभा निवडणुकीमध्ये भाजप-शिवसेना युती गेल्या निवडणुकीसारखेच यश मिळवेल, असे नेत्यांना वाटत असले. तरी यावेळी काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस या दोन्ही पक्षांनीही निवडणुकीत चांगलाच जोर लावला होता. त्यामुळे त्यांच्याही जागा वाढण्याची शक्यता आहे. या सगळ्या पार्श्वभूमीवर विधानसभा निवडणुकीच्या आधी विरोधी पक्षांच्या गोटात हालचाल निर्माण कऱण्याचा भाजपचा प्रयत्न आहे. त्यासाठीच काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसमधील नेत्यांना पक्षात घेऊन त्यांना थेट मंत्रिपद देण्याचे नियोजन पक्षाने केले आहे.

राधाकृष्ण विखे पाटील यांनी विधानसभेतील विरोधी पक्षनेते पदाचा राजीनामा दिला आहे. त्यांनी नगर लोकसभा मतदारसंघात उघडपणे सुजयचा प्रचार केला होता. त्याचवेळी नगर जिल्ह्यातील शिर्डी मतदारसंघातही त्यांनी शिवसेनेच्या उमेदवाराचा प्रचार केला होता. माढा मतदारसंघातील राष्ट्रवादी काँग्रेसचे विद्यमान खासदार विजयसिंह मोहिते पाटील यांनीही यावेळी भाजपच्या उमेदवाराचा जोरदार प्रचार केला.

भाजप स्वबळावर सत्ता स्थापन करु शकणार नाही : संजय राऊत

भाजपच्या एका ज्येष्ठ नेत्याने सांगितले की, राधाकृष्ण विखे पाटील, विजयसिंह मोहिते पाटील आणि जयदत्त क्षीरसागर हे तिघेही जवळपास भाजपत आल्यासारखेच आहेत. या तिघांना मंत्रिपद देण्याचे नियोजन करण्यात आले आहे. त्यामुळे त्यांच्या कार्यक्षेत्रात याचा प्रभाव पडू शकतो. देवेंद्र फडणवीस पक्षश्रेष्ठींशी चर्चा करीत असून, लवकरच अंतिम निर्णय येईल. जर हा निर्णय घेण्यात आला, तर जूनच्या पहिल्या किंवा दुसऱ्या आठवड्यात राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार होईल.
भाजप आणि शिवसेनेतील काही नेत्यांनाही मंत्रिमंडळात जागा मिळेल. त्याचबरोबर सध्याच्या मंत्र्यांची खातीही बदलण्यात येतील.

पुण्यातून लोकसभेसाठी भाजपचे उमेदवार गिरीश बापट निवडून आले तर ते त्यांच्या मंत्रिपदाचा राजीनामा देतील. दुसरीकडे शिवसेनेचे मंत्री दीपक सावंत यांनी आधीच राजीनामा दिला आहे. त्यामुळे मंत्रिमंडळात बदल केले जातील, असेही या नेत्याने सांगितले.