पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

मी पाहिलेले उद्धव ठाकरे हे नाहीत: देवेंद्र फडणवीस

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

मी पाहिलेले उद्धव ठाकरे हे नाहीत, ते या थराला जातील असे वाटले नव्हते, अशी टीका भाजपचे नेते आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे. कोल्हापूर येथे देवेंद्र फडणवीस आणि चंद्रकांत पाटील यांची पत्रकार परिषद झाली. यावेळी त्यांनी कर्जमाफीच्या मुद्द्यावरुन देखील सरकारला लक्ष्य केले आहे. 

आता राहुल आणि प्रियांका गांधींनी लोकांना केलं हे आवाहन

देवेंद्र फडणवीस यांनी पुढे असे सांगितले की, 'काँग्रेस राष्ट्रवादीच्या जीवावर महाराष्ट्रात शिवसेनेचं सरकार आणेल असा शब्द उद्धव ठाकरे यांनी बाळासाहेब ठाकरे यांना दिलाच नसले. असा शब्द बाळासाहेब ठाकरे यांनी कधीच ऐकून घेतला नसता. सत्तास्थापनेसाठी मी कुठल्याही स्तरावर जायला तयार आहे, हे त्यांचे बोलणे ऐकून मला खूप आश्चर्य वाटले. मी पाहिलेले उद्धव ठाकरे ते नाहीत, असे फडणवीस यांनी सांगितले. 

नुसत्या आडनावाने कोणी ठाकरे होत नाही, अमृता फडणवीसांची टीका

दरम्यान, कर्जमाफीच्या मुद्द्यावरुन फडणवीस यांनी सरकारवर जोरदार टीका केली आहे. शेतकरी अडचणीत असून त्याला तात्काळ मदतीची गरज आहे. त्यांना थेट कर्जमाफी द्यायला हवी होती. मात्र सरकारने ते न करता उधारीची कर्जमाफी केली, असल्याची टीका फडणवीस यांनी केली आहे. तसंच, विश्वासघाताने तयार झालेल्या सरकारने शेतकऱ्यांचा देखील विश्वासघात केला असल्याचा आरोप त्यांनी केला आहे. कर्जमाफीचा फायदा कोल्हापूर, सातारा आणि सांगली भागातील शेतकऱ्यांना होणार नाही, असा आरोप देखील त्यांनी यावेळी केला आहे. 

साताऱ्याच्या कोयना परिसरात पुन्हा भूकंपाचे धक्के