केंद्राचे ४० हजार कोटी रुपये वाचवण्यासाठी देवेंद्र फडणवीस हे ८० तासांचे मुख्यमंत्री झाल्याचा दावा भाजपचे खासदार अनंतकुमार हेगडे यांनी केल्यानंतर राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे. शिवसेना नेते तथा राज्यसभा सदस्य संजय राऊत यांनी भाजप आणि देवेंद्र फडणवीस यांच्यावर निशाणा साधला आहे. महाराष्ट्रातून ४० हजार कोटी परत पाठवणे ही महाराष्ट्राबरोबर विश्वासघात असल्याची घणाघाती टीका त्यांनी केली आहे.
'केंद्राचे ४० हजार कोटी वाचवण्यासाठी फडणवीस ८० तासांचे मुख्यमंत्री'
Bjp mp @AnantkumarH says @Dev_Fadanvis as CM for 80 hours, moved maharashtra's 40000 cr Rs to center ? This is treachery with maharshtra , महाराष्ट्र के साथ गद्दारी है @Officeof UT
— Sanjay Raut (@rautsanjay61) December 2, 2019
देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्राला देण्यात आलेले ४० हजार कोटी केंद्राला परत पाठवण्यासाठी ८० तासांचे मुख्यमंत्री बनले होते का ? असा अनंतकुमार हेगडे यांच्या दाव्याचा दाखला देत संजय राऊत यांनी सवाल केला आहे. याबाबत त्यांनी टि्वट केले आहे.
दुसरीकडे नवाब मलिक यांनीही भाजपवर टीका केली. या दाव्यात तथ्य असेल तर हा फक्त महाराष्ट्रच नव्हे तर इतर राज्यांवरही अन्याय असल्याचे त्यांनी म्हटले.
व्होडाफोन- आयडिया, एअरटेलची दरवाढ ३ डिसेंबरपासून लागू
हे ठरवून केलेले नाटक होते. फडणवीस हे मुख्यमंत्री झाले आणि त्यांनी १५ तासांच्या आत ४० हजार कोटी रुपये वेगवेगळ्या माध्यमातून केंद्राकडे परत पाठवले, असा दावा अनंतकुमार हेगडे यांनी केला आहे.