पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

सोलापूर पोटनिवडणूक मित्र पक्षाचा उमेदवारच लढवेल: अजित पवार

अजित पवार

'जयसिद्धेश्वर स्वामी यांच्या जागेवर पोटनिवडणूक लढवली जाणार आहे. या जागेवर काँग्रेसचा उमेदवार निवडणूक लढवेल.', असे राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सांगितले आहे. सोलापूर लोकसभा मतदारसंघाचे भाजपचे खासदार डॉ. जयसिद्धेश्वर शिवाचार्य महास्वामी यांच्या अडचणीत वाढ झाली आहे. जात पडताळणी समितीने जयसिद्धेश्वर स्वामी यांचा जातीचा दाखला बनावट असल्याचे सांगत तो रद्द केला आहे. 

दिल्लीत कायदा व सुव्यवस्था बहाल करा; केजरीवालांची केंद्राकडे मागणी

महाविकास आघाडीचे नेते आणि राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सोलापूर लोकसभा मतदार संघाच्या पोटनिवडणुकीसाठी आताच तयारीला सुरुवात केली आहे. अजित पवार यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले की, 'सोलापूरची ही जागा पूर्वी काँग्रेसने लढवली होती. आता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना महाविकास आघाडीच्या नेत्यांशी बोलावे लागेल. त्यांचे एकमत झाले तर महाविकास आघाडीचा उमेदवार म्हणून काँग्रेसचा उमेदवार निवडणूक लढवेल.', असे अजित पवार यांनी सांगितले. 

दहशतवादी कारवाया थांबवा; ट्रम्प यांचा पाकिस्तानला इशारा

जयसिद्धेश्वर महाराज यांनी २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत सोलापूर या राखीव मतदारसंघातून निवडणूक लढवली होती. त्यांनी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे, वंचित बहुजन आघाडीचे प्रकाश आंबेडकर यांचा पराभव केला होता. जयसिद्धेश्वर महाराज यांनी बेडा जंगम जातीचे प्रमाणपत्र जोडले होते. जयसिद्धेश्वर स्वामी यांचा जातीचा दाखला बनावट असल्याचे सिध्द झाल्याने त्यांचे जात प्रमाणपत्र  रद्द करण्यात आले असल्याचे जात पडताळणी समितीने सांगितले. 

भारताचा मोठा विजय! अखेर राष्ट्रकुलमध्ये नेमबाजीचा समावेश