पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

यंदाचा गुढीपाडवा घरातच साजरा करा, उपमुख्यमंत्री, राज्यपालांचे आवाहन

अजित पवार

‘कोरोनो’च्या पार्श्वभूमीवर आलेला यंदाचा गुढीपाडवा सर्वांनी घरात थांबूनच साजरा करावा, कुणीही घराबाहेर पडू नये, रस्त्यावर येऊ नये, गर्दी टाळावी, असं आवाहन उपमुख्यमंत्री अजित पवार  केलं आहे. देशावरचा ‘कोरोना’चा धोका पूर्णपणे संपल्यानंतरचा आनंद साजरा करण्यासाठी या गुढीपाडव्याचा उत्साह राखून ठेवावा, असं म्हणत त्यांनी गुढीपाडव्याच्या शुभेच्छाही दिल्या आहेत. गिरगांव, ठाणे, डोबिंवली, पनवेल यांसारख्या ठिकाणी गुढी पाडव्यानिमित्तानं मोठ्या स्वागत यात्रा निघतात. मात्र कोरोनाच्या पार्श्वभूमीवर या  स्वागत यात्रा रद्द करण्यात आल्या आहेत. 

आणखी कठोर पावलं उचलायला भाग पाडू नका : उपमुख्यमंत्री

'गुढीपाडवा आणि मराठी नववर्षाची सुरुवात घरोघरी गुढ्या उभारुन, शोभायात्रांचं आयोजन करुन सामुहिक पद्धतीनं करण्याची आपली परंपरा आहे. यावेळीही घरोघरी गुढ्या उभारल्या जातील, परंतु शोभायात्रांचं आयोजन व सामुहिक आयोजन टाळण्याचा घेतलेला निर्णय स्वागतार्ह, कौतुकास्पद असल्याचं उपमुख्यमंत्र्यांनी म्हटलं आहे. नागरिकांनी यंदा ‘कोरोना’विरोधात लढण्याची, जनजागृती करण्याची, ‘कोरोना’ला हरविण्याच्या संकल्पाची गुढी उभारावी', असं आवाहनही उपमुख्यमंत्र्यांनी राज्यातील जनतेला केलं आहे.

... या खासगी लॅबना कोरोना विषाणू शोध चाचणी करण्यास मंजुरी

गुढी पाडव्याचा सण आपण आपापल्या घरी अत्यंत साधेपणाने साजरा करावा. घरी रहा आणि सुरक्षित रहा !, असं आवाहन राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनीदेखील केलं आहे. राज्य तसेच संपूर्ण देश एका अभूतपूर्व संकट प्रसंगातून जात आहे.  शासनातर्फे या संकटाला तोंड देण्यासाठी विविध उपाययोजना केल्या जात आहेत. मात्र नागरिकांच्या संपूर्ण सहकार्याशिवाय हे कार्य होणे शक्य नाही.  शासनाला संपूर्ण सहकार्य करावे, असं आवाहनही राज्यपालांनी केलं आहे. 

  • Marathi News: संबंधित इतर बातम्या वाचण्यासाठी आम्हाला लाईक करा आणि फॉलो करा.
  • Web Title:deputy chief minister ajit pawar on gudhi padwa celebration deputy chief minister ajit pawar