पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

भाजप, आरएसएसने दिल्लीत दंगल घडवली: प्रकाश आंबेडकर

प्रकाश आंबेडकर

दिल्ली हिंसाचाराप्रकरणी वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि भाजपवर गंभीर आरोप केला आहे. दिल्लीत झालेली दंगल ही पूर्वनियोजित असून, ती दंगल आरएसएस व भाजपने घडवली आहे. यामुळे पुन्हा दंगल झाली तर आश्चर्य मानू नका, असेही प्रकाश आंबेडकर यांनी म्हटले आहे. ते पंढरपूर येथे एका कार्यक्रमात बोलत होते.

मुस्लिम आरक्षणावर उद्धव ठाकरे गप्प का, भाजपचा सवाल

आंबेडकर पुढे म्हणाले की, दंगलीमध्ये सैनिकांचे गणवेश परिधान करून इतर लोक घुसल्याचे पोलिस व राजकीय नेते सांगतात. एका अहवालानुसार २५ लाख सैनिकी गणवेश कोणीतरी विकत घेतले आहेत. याची माहिती सरकारने काढणे गरजेचे आहे. या सर्व घटनेवरून पुन्हा दंगल झाली तर आश्चर्य वाटणार नाही. 

Yes Bank: ३० तासांच्या चौकशीनंतर ईडीने राणा कपूर यांना केली अटक

देशात ४३१ ठिकाणी शाहिनबाग आंदोलन घडतंय. मात्र याचे वार्तांकन होत नाही. हे आंदोलन असेच चालू राहील. आसाममध्ये १९ लाख लोक निर्वासित झाले आहेत. ते त्यांची नागरिकता सिध्द करू शकले नाहीत. त्यात १४ लाख २० हजार हिंदू आहेत. त्यामुळे या कायद्याचा फटका दलित, आदिवासी आणि मुस्लिमांना बसणार आहे, असे आंबेडकर यांनी सांगितले.

महिला दिन विशेष : लेडीज डब्बा... येता का आमच्या जगात?

सोलापूरचे खासदार जयसिध्देश्वर महास्वामी कोर्टात लढत खासदार म्हणून पाच वर्षे काढतील, असा दावाही त्यांनी केला. खासदार जयसिद्धेश्वर महाराज यांचे जात प्रमाणपत्र बनावट असल्याचे सिद्ध झाले आहे. खासदार जयसिद्धेश्वर महाराज यांनी आता याप्रकरणी न्यायालयात धाव घेतली आहे.