पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

पश्चिम महाराष्ट्रात पूरामुळे आतापर्यंत ५४ जणांचा मृत्यू

कोल्हापूर

पश्चिम महाराष्ट्राला मुसळधार पावसाने झोडपून काढले होते. या पावसामुळे आलेल्या पूराचा फटका पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर आणि सोलापूर या जिल्ह्यांना बसला. या पूराचे पाणी हळूहळू ओसरत आहे. एएनआय या वृत्तसंस्थेने दिलेल्या माहितीनुसार, या पूरामध्ये आतापर्यंत ५४ जणांचा मृत्यू झाला आहे. तर ४ जण अद्याप बेपत्ता आहेत.

टीम इंडियाच्या प्रशिक्षकपदी पुन्हा रवी शास्त्रींची निवड

पुणे, सांगली, कोल्हापूर, सातारा आणि सोलापूरमध्ये आलेल्या महापूरामध्ये मोठ्याप्रमाणात जीवितहानी झाली. या भागामधून वाहणाऱ्या नदीला आलेल्या पूराचे पाणी शहरांसह नदीकाठची गावं पाण्याखाली गेली होती. या पूराचा फटका सर्वात जास्त सांगली आणि कोल्हापूर या जिल्ह्यांना बसला होता. या पूरामुळे फक्त जीवितहानी नाही तर वित्तहानी देखील झाली आहे. अनेकांचे संसार उध्वस्त झाले. या पूरामुळे आतापर्यंत ५४ जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे तर ४ लोकं बेपत्त आहेत. तर ८ हजार प्राण्याचा या पूरामुळे मृत्यू झाला असून ९ हजार ७०२ घरं कोसळली आहेत. 

बलुचिस्तान पुन्हा बॉम्बस्फोटाने हादरले; ४ जणांचा मृत्यू