पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

पश्चिम महाराष्ट्रात पूरामुळे 29 जणांचा मृत्यू; 6 बेपत्ता

कोल्हापूर पूर

पश्चिम महाराष्ट्राला मुसळधार पावसाने झोडपून काढले आहे. या पावसामुळे पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर आणि सोलापूर या जिल्ह्यामध्ये पूर आला आहे. एएनआय या वृत्तसंस्थेने दिलेल्या माहितीनुसार, या पूरामध्ये आतापर्यंत 29 जणांचा मृत्यू झाला आहे. तर 6 जण बेपत्ता झाले आहेत. तर पूराचा फटका बसलेल्या 2 लाख 85 लाख नागरिकांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आले आहे.

पाकिस्तानने थार एक्स्प्रेस रोखली; भारताने दिले सडेतोड उत्तर

गेल्या आठवडाभरापासून पडणाऱ्या मुसळधार पावसामुळे पुणे, सांगली, कोल्हापूर, सातारा आणि सोलापूरमध्ये मोठ्याप्रमाणात जीवितहानी झाली. या भागामधून वाहणाऱ्या नदीला आलेल्या पूराचे पाणी शहरांसह नदीकाठच्या गावांमध्ये शिरल्यामुळे शहसांसह गावंच्या गावं पाण्याखाली गेली आहेत. या पूराचा फटका सर्वात जास्त सांगली आणि कोल्हापूर या जिल्ह्यांना बसला आहे. पाऊस आणि पूरामुळे आतापर्यंत 29 जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे.

दाभोलकर हत्या प्रकरण: सीबीआय समुद्रात शस्त्रास्त्र शोधणार

दरम्यान, सातारा, सांगली, कोल्हापूर या भागामध्ये जिल्हा प्रशासनासह एनडीआरएफचे जवान, लष्कराचे जवान, नौदलाचे जवान आणि वायू दलाचे जवान यांच्याकडून बचावकार्य सुरु आहे. पूरामुळे सातारा, सांगली, कोल्हापूरमधील नागरिकांचे जनजीवन पूर्णत: विस्कळीत झाले. त्यांचे संसार उध्वस्त झाले आहेत. अद्याही काही नागरिक पूरामध्ये अडकले आहेत त्यांना सुरक्षितस्थळी हलवण्याचे प्रयत्न सुरु आहे. पूरग्रस्तांसाठी संक्रमण शिबिर उभारण्यात आली असून त्याठिकाणी त्यांच्या राहण्याची आणि जेवणाची सोय करण्यात आली आहे. 

मुख्यमंत्र्यांसह मंत्र्यांविरोधात गुन्हे दाखल करा - नाना पटोले