पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

कसारा घाटातल्या नव्या रस्त्याला तडे; मोठी वाहतूक कोंडी

कसारा घाट

मुंबईवरुन नाशिकला जाणाऱ्या कसारा घाटामध्ये पुन्हा रस्त्याला तडे गेल्याची घटना घडली आहे. गेल्या आठवड्यापासून पडणाऱ्या संततधार पावसामुळे इगतपुरी - कसारा घाटातील नव्या रस्त्याला तडे गेले आहेत. त्यामुळे कसारा घाटामध्ये वाहतूक कोंडी झाली आहे. रस्त्याला तडे गेलेल्या ठिकाणी बॅरिकेट्स लावून वाहतूक एका मार्गिकेवरुन सुरु ठेवली आहे. दरम्यान, रस्ता दुरुस्तीचे काम युध्दपातळीवर सुरु आहे.

अखंड हिंदुस्थानचे निम्मे स्वप्न पूर्ण झाले, शिवसेनेकडून सरकारचे कौतुक

आठवडाभरापूर्वी जुन्या कसारा घाटातील रस्त्याला तडे गेले होते. जवळपास 100 मीटर लांबीपर्यंत रस्त्याला तडे गेले होतो. त्यामुळे प्रशासनाने सुरक्षिततेच्या कारणास्तव कसारा घाट 10 दिवसांसाठी बंद ठेवण्याचा निर्णय घेत वाहतूक घाटातल्या नव्या रस्त्यावरुन सुरु केली होती. मात्र घाटातील नव्या रस्त्याला देखील आज सकाळी तडे गेल्याने मोठी वाहतूक कोंडी झाली आहे. 

कलम ३७० : अमित शहा यांना कोणाची मदत होती माहितीये?

दरम्यान, या घटनेची दखल घोटी टॅपच्या महामार्ग ट्रॅफिक पोलिसांनी आणि रुट पेट्रोलिंगचे कर्मचारी यांनी घेतली असून त्यांनी त्वरीत घटनास्थळी धाव घेतली. वाहतूकीस अडथळा येणार नाही याची दक्षता घेऊन वाहतूक संथगतीने का होईना सुरू ठेवली आहे. सध्या एका मार्गिकेवरुन वाहतूक सुरु आहे. घटनास्थळी वाहतूक पोलिस दाखल झाले असून वाहतूक सुरळीत करण्याचा प्रयत्न करत आहेत. 

नाशिकमध्ये 6 वाडे कोसळले; सुदैवाने जीवितहानी नाही