पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

पैशाच्या वादातून मित्राची हत्या, जालन्यात भाजपचा पदाधिकारी अटकेत

प्रतिकात्मक छायाचित्र

जालन्यात पैशाच्या वादातून मित्राची हत्या करणाऱ्या तरुणाला अटक करण्यात आली आहे. संशयित आरोपी हा भाजपच्या ओबीसी मोर्चाचा शहर उपाध्यक्ष असल्याची माहिती समोर येत आहे. संशयिताचे नाव विजय मुंगसे असून मृत युवकाचे नाव हे कुमार झुंजूर आहे. विशेष म्हणजे दोघेही चांगले मित्र होते.

जालना शहरातील जिनिंग किल्ला भागात एका युवकाचा मृतदेह आढळून आला होता. पोलिसांनी तपास केला असता कुमार झुंजूरचा मृतदेह असल्याचे समोर आले. पोलिसांनी तपासाची सूत्रे हलवली असता संशयाची सुई विजय मुंगसेकडे वळली. पोलिसांनी विजय मुंगसेला अटक केली. पोलिसांनी खाक्या दाखवताच विजयने हत्येची कबुली दिली आहे. 

संशयित विजय मुंगसे आणि मृत कुमार झुंजूर हे मित्र होते. विजयने कुमारकडे १ लाख २० हजार रुपये ठेवण्यासाठी दिले होते. मात्र हे पैसे परत करण्यास कुमार टाळाटाळ करत होता. याच रागातून विजयने कुमारचा खून केला. 

याची कबुली आरोपी विजयने दिली आहे. पोलिसांनी त्याला अटक केली असून याप्रकरणी तपास करण्यात येत आहे.