पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

'राज्यातील तब्बल १४०० लोक मरकजमधील कार्यक्रमात सहभागी झाले होते'

आरोग्य मंत्री राजेश टोपे

देशातील कोरोना विषाणूच्या संक्रमणाची साखळी तोडण्याच्या दृष्टीने केंद्र आणि राज्य सरकार सर्वोत्परी पर्यत्न करताना दिसत आहे. युरोपातील परिस्थिती आपल्यावर ओढावू नये यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कठोर पावले उचलत देशात सर्वत्र लॉकडाऊनची घोषणा केली. अत्यावश्यक सेवेच्या व्यतिरिक्त घरातून बाहेर पडण्यावर निर्बंध लादले असतानाही दिल्लीतील निजामुद्दीन भागात तबलीगी समाजाचे मुख्यालय असलेल्या मरकजमध्ये धार्मिक कार्यक्रम झाल्याचे समोर आल्याने एकच खळबळ माजली होती.

अरूणाचल प्रदेशच्या सीएमचा दावा; १५ एप्रिलला लॉकडाऊन संपेल, पण... 

वेगवेगळ्या देशातील परदेशी नागरिक या कार्यक्रमात सहभागी झाले होते. महाराष्ट्र राज्यातून तब्बल  १४०० लोक या कार्यक्रमात सहभागी झाले होते, अशी माहिती राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली आहे. आतापर्यंत यातील १३०० लोकांता शोध घेतला असून या सर्वांचे कोविड  १९ चाचणीसाठी नमुने घेतल्याची माहितीही राजेश टोपे यांनी दिली. उर्वरित लोकांचा शोध सुरु आहे, असेही त्यांनी सांगितले. यापूर्वी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यात मरकजप्रमाणे कोणात्याही धार्मिक कार्यक्रमाला परवानगी देऊ नये, अशा सूचना अधिकाऱ्यांना देण्यात आल्या आहेत.

तिरस्काराचा व्हायरस पसरवू नका, भज्जीने नेटकऱ्यांना लगावली चपराक

एवढेच नाही तर ज्या लोकांनी दिल्लीतील कार्यक्रमाला हजेरी लावली होती त्यांनी स्वत:हून पुढे यावे, असे आवाहन उद्धव ठाकरे यांनी केले होते. दिल्लीतील या कार्यक्रमाला राज्याच्या विविध भागातून मंडळींनी हजेरी लावली होती. या कार्यक्रमात अनेक परदेशी नागरिकही उपस्थितीत होते. या कार्यक्रमातील काही परदेशी नागरिकांसह काहींचे रिपोर्टस् हे पॉझिटिव्ह आल्यामुळे कोरोनाग्रस्तांचा आकडा मोठ्या संख्येने वाढण्याची भिती निर्माण झाली आहे.

  • Marathi News: संबंधित इतर बातम्या वाचण्यासाठी आम्हाला लाईक करा आणि फॉलो करा.
  • Web Title:COVID19 testing Over 1400 people from Maharashtra attended the Tablighi Jamaat event in Delhi Says state Health Minister Rajesh Tope