राज्यात नव्याने आढळणाऱ्या रुग्णांचा आकडा कालच्या (गुरुवार) तुलनेत जवळपास दुप्पटीने कमी झाला. नव्या ३९४ रुग्णासह राज्यातील कोरोनाग्रस्तांचा आकडा हा ६ हजार ८१७ पोहचला आहे. मागील २४ तासांत कोरोनाने १८ जणांचा बळी घेतला. यात मुंबईतील सर्वाधिक १८ रुग्णांचा समावेश आहे. पुण्यातील ५ जणांसह नाशिकमधील मालेगावात २ जणांनी कोरोनामुळे आपला जीव गमावला आहे. यासहा राज्यातील मृतांचा आकडा हा ३०१ झालाय. गुरुवारी राज्यात सर्वाधिक ७७८ नव्या रुग्णांसह महाराष्ट्रातील कोरोनाचा आकडा हा ६ हजार ४२७ वर पोहचला होता.
मोदी सरकारच्या या तीन निर्णयांमुळे कोरोनाचा संक्रमण वेग आवाक्यात
सरकारच्या माहितीनुसार, राज्यात आतापर्यंत १ लाख २ हजार १८९ लोकांच्या चाचण्या घेण्यात आल्या आहेत. मागील २४ तासांत एकूण ५ हजार ८२० लोकांचे नमुने तपासणीसाठी घेतले आहेत. कोरोनातून बरे झालेल्या आकड्यातही वाढ होत आहे. आज नव्याने ११७ रुग्णांच्या प्रकृतीमध्ये झालेल्या सुधारणेनंतर राज्यातील कोरोनातून मुक्त होणाऱ्या लोकांचा आकडा हा ९५७ वर पोहचला आहे. राज्यातील आजच्या आकडेवारीतही मुंबईतील रुग्णांचा आकडा हा अधिक आहे. ३९४ पैकी २२४ रुग्ण हे मुंबई शहरात आढळले आहेत. या रुग्णांसह मुंबईतील कोरोनाग्रस्तांचा आकडा हा ४ हजार ४४७ इतका झाला असून शहारातील मृतांची संख्या १७८ इतकी झाली आहे.
'देशातील ८० जिल्ह्यात १४ दिवसांत एकही पॉझिटिव्ह रुग्ण नाही'
देशात परदेशातील नागरिकांसह कोरोना विषाणूची लागण झालेल्यांचा आकडा हा २३ हजार ४५२ वर पोहचला आहे. देशात आतापर्यंत एकूण ७२३ लोकांनी कोरोनामुळे जीव गमावला आहे. मागील २४ तासांत देशात १ हजार ७५२ नवे रुग्ण आढळले आहेत. कोरोना विषाणूच्या संक्रमणाचा वेग मंदावल्याचे वृत्त सरकार आणि देशवासियांसाठी दिलासादायक असेच आहे.