पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

राज्यात ५२२ नव्या रुग्णांची वाढ, आतापर्यंत १,२८२ रुग्ण झाले बरे

कोरोना विषाणूबाधित रुग्णावर उपचार सुरु असतानाचे संग्रहित छायाचित्र

राज्यात ५२२ नव्या रुग्णांसह कोरोनाग्रस्तांचा आकडा हा ८ हजार ५९० वर पोहचला आहे. मागील २४ तासांत २७ लोकांचा कोरोनामुळे मृत्यू झालाय. यासह राज्यातील एकूण मृतांचा आकडा हा ३६९ इतका झाला आहे. देशातील सर्वाधिक रुग्ण हे महाराष्ट्रात आढळले असून सर्वाधिक चाचण्यादेखील महाराष्ट्रातच झाल्या आहेत.  आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी दिलेल्या माहितीनुसार, मागील २४ तासांतील ५ हजार २१७ चाचणीसह राज्यात आतापर्यंत १ लाख २१  हजार ५६२ लोकांची तपासणी करण्यात आली आहे. सोमवारी कोरोनातून बरे झालेल्या ९४ रुग्णांसह कोरोनामुक्त लोकांचा आतापर्यंतचा आकडा १ हजार २८२ इतका आहे.

Covid19 टेस्ट किट भ्रष्टाचारावर राहुल गांधी म्हणाले,मोदीजी कारवाई करा!

राज्यातील सर्वाधिक रुग्ण हे मुंबईत आढळले आहेत. मागील २४ तासांत ५९० पैकी ३६९ रुग्ण हे राज्याच्या राजधानीत सापडले आहेत. आजच्या (सोमवारी) १५ रुग्णांच्या मृतांसह मुंबईत आतापर्यंत २१९  जणांनी कोरोनामुळे जीव आपला गमावला आहे. राज्यातील परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी सरकार प्रयत्नशील आहे. सुमारे तीन हजार व्हेंटिलेटर्स उपलब्ध आहेत. ८० हजाराच्या आसपास पीपीई किटस तर २ लाख ८२ हजार एन ९५ मास्क उपलब्ध आहेत.

या दोन चिनी कंपन्यांचे रॅपिड टेस्टिंग किट वापरु नका: ICMR

राज्यात कोरोनासाठी त्रिस्तरीय उपचार व निगा केंद्रे स्थापन करण्यात आली असून  सध्या तीन वर्गवारीतील १ हजार ६७७ उपचार केंद्र असून त्यामध्ये १ लाख ७६ हजार ३४७ विलगीकरण (आयसोलेशन) खाटांची संख्या आहे तर ७२४८ अतिदक्षता (आयसीयू) खाटांची उपलब्धता आहे, अशी माहिती आरोग्यमंत्र्यांनी ट्विटच्या माध्यमातूनही दिली.चीनच्या वुहानमधून जगभरासह पसरलेल्या कोरोना विषाणूमुळे भारताची डोकेदुखी देखील वाढली आहे. भारतात परदेशी नागरिकांसह कोरोना विषाणूबाधितांचा आकडा वाढून सोमवारी २७,८९२ इतका झाला आहे. आरोग्य मंत्रालयाने सोमवारी आकडेवारी जाहीर केली. आतापर्यंत यात ८७२ जणांचा मृत्यू झाला आहे.    

  • Marathi News: संबंधित इतर बातम्या वाचण्यासाठी आम्हाला लाईक करा आणि फॉलो करा.
  • Web Title:COVID 19 Maharashtra States count goes to 8590 as 522 new cases found on Monday 369 Total deaths till date