पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

सावध रहा! पुढचे पंधरा दिवस कसोटीचे: उद्धव ठाकरे

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

कोरोना विषाणूच्या वाढत्या संक्रमणाच्या पार्श्वभूमीवर पुढचे १५ दिवस महत्त्वाचे आहेत, असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी म्हटले आहे. खबरदारीच्या पार्श्वभूमीवर घरातून बाहेर पडणे टाळावे, असे आवाहन पुन्हा एकदा मुख्यमंत्र्यांनी केले आहे. कोरोना हे जागतिक संकट असून त्यावर आपण मात निश्चित करु. पण त्यासाठी आपल्याला राज्य सरकारने दिलेल्या सूचनांच पालन करण्याची आवश्यकता असल्याचेही त्यांनी म्हटले आहे. कोरोना विषाणूच्या वाढत्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर त्यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. 

पिंपरी-चिंचवडमध्ये जमावबंदी लागू पण...

यावेळी ते म्हणाले की, पुणे-मुंबई या शहरानंतर आता ग्रामीण भागातील शाळा महाविद्यालय बंद ठेवण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे.  राज्यातील कोरोनाग्रस्तांचा आकडा दिवसेंदिवस वाढणे ही चिंतेची बाब असली तरी घाबरुन जाण्याची गरज नाही. राज्यावर अजूनही संपूर्ण शट डाऊनची वेळ आलेली नाही. आगामी पंधरा दिवस महत्त्वाचे असून आपण योग्य ती खबरदारी घेत या संकटावर मात करु शकतो, असा विश्वास मुख्यमंत्र्यांनी यावेळी व्यक्त केला. 

पुण्यातील जमाव बंदीच्या प्रश्नावर आरोग्यमंत्र्यांनी दिले स्पष्टीकरण

राज्यातील सर्व परीक्षा या पुढे ढकलण्यात आल्या आहेत, निवडणुका सुद्धा पुढे ढकलण्यासाठी राज्य सरकारने निवडणूक आयोगाला विनंती केली आहे, अशी माहिती उद्धव ठाकरे यांनी दिली आहे. सध्याच्या परिस्थितीत कोणीही काळजी करण्याची आवश्यकता नाही. सर्व ठिकाणी सगळ्या आवश्यक उपाययोजना केलेल्या आहेत. संकटकालीन परिस्थितीत पुढे सरसावलेल्या पुण्यातील काही स्वयंसेवी संस्थाचेही मुख्यमंत्र्यांनी यावेळी कौतुक केले. पुण्यातील काही संस्था मास्क आणि हँड सँनिटायझरचे वाटप करत आहेत. स्वच्छतेसंदर्भात त्यांनी घेतलेला पुढाकार कौतुकास्पद आहे, असे उद्धव ठाकरे यांनी म्हटले आहे.