पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

५९७ नव्या रुग्णांसह राज्यातील कोरोनाग्रस्तांचा आकडा ९,९१५ वर

कोरोना विषाणूबाधितांच्या संख्येतील वाढ कमी झाली आहे. (संग्रहित छायाचित्र)

राज्यात नव्याने आढळलेल्या ५९७ नव्या रुग्णांसह कोरोनाग्रस्तांचा आकडा ९  हजार ९१५ वर पोहचला आहे. मागील २४ तासांत ३१ नव्या रुग्णांनी कोरोनामुळे आपला जीव गमावला. यात मुंबईतील २६ रुग्णांसह पुण्यातील ३, सोलापूर आणि औरंगाबादमधील प्रत्येकी एकाचा समावेश आहे. राज्यातील मृत्यांचा आकडा हा  ४३२ इतका झालाय. राज्यातील कोरोनाग्रस्तांच्या आकडेवारीत चढ-उतार पाहायला मिळत आहे. दिवसागणिक मुंबईत सर्वाधिक रुग्ण आढळत असून त्यापाठोपाठ पुणे आणि नागपूरमधील मालेगावातही रुग्णांचा आकडा वाढतानाचे चित्र आहे.

लॉकडाऊनमध्ये अडकलेल्या कामगार, विद्यार्थ्यांना घरी जाण्यास परवानगी 

राज्य सरकार आणि प्रशासन कोरोना विषाणूचे वाढते संक्रमण रोखण्यासाठी युद्ध पातळीवर प्रयत्न करत आहे. राज्याचे आरोग्यमंत्री वेगवेगळ्या ठिकाणी भेटी देत परिस्थितीचा आढावा घेत आहेत. बुधवारी आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी नाशिक जिल्ह्यातील मालेगावचा दौरा केला. नाशिकमध्ये जिल्हाधिकाऱ्यांसोबतच्या चर्चेनंतर त्यांनी प्रसारमाध्यमांशीही संवाद साधला होता. मालेगाव वगळता नाशिक शहर आणि ग्रामीण भागासह येवला परिसरातील परिस्थिती उत्तम आहे, अशी माहिती आरोग्यमंत्र्यांनी दिली होती.  

लॉकडाऊन: पुणे रेल्वे स्थानकावर सोशल डिस्टन्सिंगची रणनिती

देशातील कोरोना विषाणूचा वाढता प्रादुर्भाव नियंत्रणात आणण्यासाठी देशव्यापी लॉकडाऊनची घोषणा करण्यात आली आहे. लॉकडाऊऩचा कालावधी अंतिम टप्प्यात असताना पंजाब राज्याने दोन आठवडे लॉकडाऊन कायम ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. या कालावधीत ठराविक वेळेत लॉकडाऊन शिथिल करण्याचीही घोषणा करण्यात आली आहे. राज्यात यासंदर्भात काय निर्णय घेण्यात येणार? याचीही जनतेला उत्सुकता आहे. यापूर्वी राज्याच्या आरोग्यमंत्र्यांनी कोरोनाचा सर्वाधिक प्रादुर्भाव असलेल्या भागातील निर्बंध कायम ठेवावे लागू शकतात, असे संकेत दिले होते. 

  • Marathi News: संबंधित इतर बातम्या वाचण्यासाठी आम्हाला लाईक करा आणि फॉलो करा.
  • Web Title:Covid 19 597 cases registered today Maharashtra States case count goes to 9915 Death toll of the state 432 on till date