पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

जयसिद्धेश्वर महास्वामींच्या अडचणीत वाढ; गुन्हा दाखल करण्याचे कोर्टाचे आदेश

भाजप खासदार डॉ. जयसिद्धेश्वर महास्वामी

सोलापूर लोकसभा मतदारसंघाचे भाजपचे खासदार डॉ. जयसिद्धेश्वर शिवाचार्य महास्वामी यांच्या अडचणींमध्ये वाढ झाली आहे. बनावट जात प्रमाणपत्र प्रकरणी सोलापूर जिल्हा न्यायालयाने जयसिध्देश्वर महास्वामींविरोधात गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले आहेत. तसंच गुन्हा दाखल केल्यानंतर त्याची माहिती न्यायालयाला देण्यासंदर्भात पोलिसांना बजावण्यात आले आहे. त्यामुळे जयसिध्देशर महास्वामी यांची खासदारकी धोक्यात आली आहे. 

मुंबईतील जोगेश्वरीमध्ये गोदामाला भीषण आग

बनावट जात प्रमाणपत्रावरुन जयसिध्देश्वर महास्वामींच्या अडचणी वाढतच चालल्या आहेत. खासदारकी वाचवण्यासाठी त्यांचे प्रयत्न सुरु आहेत. मात्र आता न्यायालयाने त्यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले आहेत.  याआधी जात पडताळणी समितीने जयसिद्धेश्वर स्वामी यांचा जातीचा दाखला बनावट असल्याचे सांगत तो रद्द केला होता. तर ९ फेब्रुवारी रोजी अक्कलकोट-सोलापूर प्रवासा दरम्यान वळसंग पोलिस ठाण्याच्या हद्दीमध्ये जातीचा दाखला हरवल्याची तक्रार त्यांनी दाखल केली होती. 

कोरोना: पुण्याच्या रुग्णालयातील भार कमी होणार, मुंबईतही यंत्रणा सज्ज

जयसिद्धेश्वर महास्वामी यांनी सोलापूर लोकसभा या राखीव मतदारसंघातून लोकसभा निवडणूक लढवली होती. या निवडणुकीत त्यांनी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सुशीलकुमार शिंदे, वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांचा पराभव केला होता. जयसिद्धेश्वर महाराज यांनी निवडणुकीसाठी अर्ज दाखल करताना बेडा जंगम जातीचे प्रमाणपत्र जोडले होते. प्रमोद गायकवाड, मिलिंद मुळे आणि विनायक कंडकुरे यांनी जयसिद्धेश्वर स्वामींच्या जात प्रमाणपत्रावर आक्षेप घेत त्यांच्याविरोधात तक्रार दाखल केली होती. 

Paytm कर्मचाऱ्याला कोरोनाची लागण, कंपनीचा 'वर्क फ्रॉम होम'चा निर्णय