पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

धक्कादायक: जालन्यात प्रेमी युगुलाला मारहाण करत तरुणीचा विनयभंग

प्रेमी युगुलांना मारहाण

जालन्यामध्ये प्रेमी युगुलांना मारहाण करुन तरुणीचा विनयभंग केल्याची धक्कादाक घटना समोर आली आहे. एकमेकांना भेटण्यासाठी आलेल्या प्रेमीयुगुलांना चार गावगुंडांनी मारहाण करतानाचा व्हिडिओ तयार केला. हा व्हिडिओ जालन्यामध्ये व्हायरल होत आहे. या घटनेची दखल घेत जालना पोलिसांनी आरोपींचा शोध घेण्यास सुरुवात केली आहे. दोन आरोपींना पोलिसांनी अटक केली आहे. तर उर्वरित दोघांचा शोध सुरु आहे. 

विकासदर ६ ते ६.५ टक्के राहिल, आर्थिक सर्वेक्षण अहवालात अंदाज

जालना तालुक्यातील गोंदेगाव परिसरात ही घटना घडली असल्याचे सांगितले जात आहे. बुलडाणा जिल्ह्यातील प्रेमीयुगुल जालना येथे फिरायला आले होते. गोंदेगावातील तळ्याजवळ ते बसले असता चार गावगुंडांनी त्यांना गाठले आणि मारहाण करण्यास सुरुवात केली. यामधील दोन गावगुंडांनी तरुणाला काठीने मारहाण केली. ही घटना दोन ते तीन दिवसांपूर्वीची असल्याचे सांगितले जात आहे. हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. 

कोरोना विषाणू : ... म्हणून गूगलने आपल्या सर्च रिझल्टमध्ये केला बदल

व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये प्रेमीयुगुल गावगुंडाकडे विनंती करताना दिसत आहेत. ‘आम्ही काहीही चुकीचं केलेलं नाही. तळं असल्यामुळे आम्ही फिरायला आलो आहोत, असे तरुण हाता-पाया पडत गावगुंडांना सांगत आहे. गावगुंडांनी तरुणीची कॉलर पकडून तिला फरफटत घेऊन जाताना व्हिडिओमध्ये दिसत आहे. तसंच 'तुझ्या वडिलांना फोन लाव त्यांना बोलावून घे', असे ते तरुणीला धमकावत आहेत.

विरोधाच्या नावाखालील हिंसाचार देशालाच कमकुवत करतो

ही धक्कादायक घटना माध्यमांनी दाखवल्यानंतर मुख्यमंत्र्यांनी या घटनेची दखल घेतली आहे. तसंच जालना पोलिसांनी याप्रकरणाची दखल घेत आरोपींच्या शोधासाठी दोन पोलिसांचे पथक तयार केले आहे. चारही आरोपींची ओळख पटली आहे. चार जणांपैकी दोघांना पोलिसांनी अटक केली आहे. तर उर्वरित दोघांचा पोलिस शोध घेत आहेत. 

'आर्थिक विषयांवरील चर्चा केंद्रस्थानी राहावी'