पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

देश आर्थिक दिवाळखोरीच्या दिशेनेः प्रकाश आंबेडकर

प्रकाश आंबेडकर

सुधारित नागरिकत्व कायद्याविरोधात येत्या २४ जानेवारीला महाराष्ट्र बंद पुकारण्यात आले असल्याची माहिती वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांनी दिली. या बंदमध्ये ३५ विविध संघटनाही सहभागी होणार असल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी त्यांनी सरकारच्या आर्थिक धोरणावर टीका केली. देश आर्थिक दिवाळखोरीच्या दिशेने जात असल्याचा आरोप त्यांनी केला. देशाच्या नवरत्न कंपन्यांना विकायला काढण्यास सरकारने सुरुवात केली आहे. भारत पेट्रोलियमसारखी फायद्यात असणारी कंपनी जिचे बाजारमूल्य ५ लाख कोटी आहे. ती ७५ हजार कोटींना मोदी सरकारने विकायला काढली आहे, असे ते म्हणाले.

बहुमत आहे म्हणून बळजबरी करू शकत नाही, चंद्रकुमार बोस यांचे खडे बोल

ते पुढे म्हणाले, कल्याणकारी योजनांसाठीही पैसे मिळणे दुरापास्त होणार आहे. आम्ही दिलेली आकडेवारी खोटी आहे, हे सरकारने सिद्ध करुन दाखवावे, असे आव्हान त्यांनी यावेळी मोदी सरकारला दिले. अर्थव्यवस्थेवर सरकार काहीच बोलत नाही. अर्थतज्ज्ञांनी यावर बोलायला हवे होते. 

प्रकाश आंबेडकरांची 'ती' भूमिका निषेधार्ह, रामदास आठवलेंची टीका

नवरत्न कंपन्या या सोन्याची अंडी देणारी कोंबडी आहे. ही कोंबडीच सरकार विकायला निघाली आहे. त्यांनी आणखी ९ कंपन्या विकायला काढल्या असल्याचे प्रकाश आंबेडकर यांनी सांगितले. 

नांदेडः चार शिक्षकांचा विद्यार्थीनीवर सामूहिक बलात्कार

दि. २४ जानेवारी रोजी पुकारण्यात आलेल्या बंदमध्ये सहभागी होण्यासाठी राज्यात सीएए, एनआरसी, एनपीआरविरोधात आंदोलन करणाऱ्या संघटनांना एकत्रित आणले आहे. यात ३५ संघटना सहभागी झाले आहेत. या सर्वांना वंचितने एकत्रित आणले असल्याचे ते म्हणाले.