पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

शरद पवारांचा तरुणांना 'वाचाल तर वाचाल' चा मोलाचा सल्ला

शरद पवार

गेल्या काही दिवसांपासून कोरोना विषाणूचा फैलाव रोखण्यासाठी देश लॉकडाऊन करण्यात आला आहे. पण पंतप्रधानांच्या घोषणेआधी महाराष्ट्रात खबरदारीचा उपाय म्हणून मुख्यमंत्र्यांनी लॉकडाऊन घोषीत केले होते. लॉकडाऊनमुळे देशातील तरुण पीढी अधिकाअधिक बैचेन झाली आहे. त्यातले काहीजण घरी बसून कंटाळा आला म्हणून सर्रास रस्त्यावर फिरत आहेत. काही संचारबंदीच्या नियमांचं उल्लंघन करुन दुचाकीवरुन फिरताना आढळून आलेत. घरी बसून करायचं काय ? असा प्रश्न पडलेल्या तरुण पिढीला राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष  शरद पवार यांनी 'वाचाल तर वाचाल' असा मोलाचा सल्ला दिला आहे. 

भारतात कोरोना विषाणू संक्रमणाचा वेग तुलनेत कमी, इराणमध्ये सर्वाधिक

तरुण पीढीनं लॉकडाऊनच्या काळात मिळालेल्या वेळेचा सदुपयोग करा. सुदैवानं मराठीत खूप भिन्न प्रकारचं साहित्य उपलब्ध आहेत. ते वाचा आणि ज्ञान संपादित करा, असा मोलाचा सल्ला त्यांनी केला  आहे. विशेष म्हणजे वैज्ञानिक विषयांवर आधारित पुस्तक तरुणांनी वाचा, प्रत्येक गोष्टीमधला वैज्ञानिक दृष्टिकोन तरुणांनी समजून घ्या आणि अधिकाधिक ज्ञान संपादन करा, असाही सल्ला त्यांनी तरुण पिढीला दिला आहे.

कोरोनावर लस निर्मितीसाठी DNA-RNA आधारित पद्धतीमुळे वेग

जनतेशी साधलेल्या संवादात त्यांनी अनेक सूचना केल्या आहेत. लोकांनी घराबाहेर पडणं टाळा. निजामुद्दीनमध्ये जे घडलं ते इथे घडू देऊ नका याची जबाबदारी प्रत्येकाची आहे, प्रत्येकानं याची काळजी घेतली पाहिजे असं आवाहन त्यांनी जनतेला केलं आहे.
 

  • Marathi News: संबंधित इतर बातम्या वाचण्यासाठी आम्हाला लाईक करा आणि फॉलो करा.
  • Web Title:Coronavirusoutbreak ncp Sharad Pawar tell young generation to read more book and utilize this time for good reason