पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

निजामुद्दीनमध्ये जे घडलं ते इथे घडू देऊ नका, शरद पवार यांची विनंती

राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार

सोशल डिस्टन्स महत्त्वाचं आहे, देशात ९० टक्के लोक सूचनांचं पालन करत आहेत मात्र १० टक्के लोक नियम पायदळी तुडवत आहेत, लोकांनी सूचनांचं पालन करा आणि पोलिसांना सहकार्य करा असं आवाहन राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी केलं आहे. निजामुद्दीन सारखा कार्यक्रम राज्यात टाळला पाहिजे, निजामुद्दीनमध्ये जे काही झालं त्याची मोठी किंमत चुकवावी लागणार आहे. तसा प्रकार इथे घडू नये याची खबरदारी प्रत्येकांनी घ्या असं आवाहन शरद पवारांनी केलं आहे, व्हिडिओद्वारे पवारांनी जनतेशी  संवाद साधला. 

कोरोनावर लस निर्मितीसाठी DNA-RNA आधारित पद्धतीमुळे वेग

८ मार्च ते २१ मार्च दरम्यान तबलिगी मरकझमध्ये झालेल्या कार्यक्रमात देशभरातूनच नाही जगभरातून लोक आले होते. भारतातून या कार्यक्रमासाठी गेलेल्या ७ जणांचा कोरोनामुळे मृत्यूही झाला. आतापर्यंत १० राज्यांतून निजामुद्दीनला गेलेले ३ हजारांहून अधिक लोक सापडले आहेत. महाराष्ट्रातून या कार्यक्रमासाठी गेलेल्या लोकांचा शोध घेऊन त्यांना क्वारंटाइन करण्यात येत आहे तशाच गोष्टींची पुनरावृत्ती पुन्हा इथे होऊ नये अशी सूचना त्यांनी केली आहे. 

शब-ए-बारातच्या दिवशी मुस्लिम समुदयानं घरीच थांबवं, घरीच नमाज आदा करावी, एकत्र येऊन नये यामुळे कोरोना विषाणूचा संसर्ग आपण थांबवू शकतो असं आवाहन पवारांनी आपल्या संवादातून केलं आहे. त्याचप्रमाणे आंबेडकर जयंतीच्या दिवशीही एकत्र येणं टाळा, यादिवशी होणारे कार्यक्रम हे लांबणीवर जातील का याचाही विचार करावा. लोकांनी घरीच थांबा खबरदारी घ्या, अशी पुन्हा एकदा विनंती व्हिडिओद्वारे त्यांनी केली आहे.

रामनवमी निमित्त पंतप्रधान मोदींचे टि्वट, म्हणाले, जय श्रीराम !

राज्यात  जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा सुरुच आहे मात्र त्या मिळणारच नाही अशा भावनांतून दुकानं, भाजी मंडईत गर्दी करणं टाळा, यासाठी विनाकारण घराबाहेर जाणं टाळा. डॉक्टर, पोलिस, सरकारनं दिलेल्या सूचना तंतोतंत पाळा.  पोलिसांशी वाद घालू नका यंत्रणेला साथ द्या असं आवाहन त्यांनी केलं आहे.