पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

नाकाबंदी दरम्यान दुचाकीस्वाराने पोलिसाच्या अंगावर घातली गाडी

जखमी झालेल्या पोलिस निरिक्षकावर उपचार सुरु

कोरोना विषाणूचा वाढता संसर्ग रोखण्यासाठी देशव्यापी लॉकडाऊन करण्यात आले आहे. याकाळात नागरिकांनी घराबाहेर पडू नये असे वारंवार सरकारकडून आणि पोलिसांकडून सांगण्यात येत आहे. मात्र अजूनही काही लोकं गाडी घेऊन घराबाहेर पडत आहे. अशात वसईमध्ये लॉकडाऊन दरम्यान पोलिसांनी नाकाबंदी केली आहे. याच दरम्यान दुचाकीवरुन आलेल्या एका तरुणाने थेट पोलिस उपनिरिक्षकाच्या अंगावर गाडी घातल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.

कोरोना आग असेल तर आपण हवा आहोत, लक्षात घ्या! - सचिन तेंडुलकर

वसई पूर्व एव्हरशाईन सर्कलजवळ आज सकाळी ११ च्या सुमारास ही घटना घडली आहे. या घटनेमध्ये पोलिस उपनिरीक्षक गंभीर जखमी झाले आहेत. सनिल पाटील असं या पोलिस उपनिरिक्षकाचे नाव असून त्यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली आहे. त्यांच्यावर वसईतील स्थानिक रुग्णालयात उपचार सुरु आहेत. सनिल पाटील वसईतील वाळीव पोलीस ठाण्यात कार्यरत आहेत.

कोविड-१९ : शेन वॉर्नने घेतली ऑस्ट्रेलियन पंतप्रधानांची फिरकी!

राज्यात कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव वाढत चालला आहे. दिवसेंदिवस कोरोनाबाधितांच्या संख्येत वाढ होत चालली आहे. अशामध्ये सरकारकडून नागरिकांना घरामध्येच थांबा, घरा बाहेर पडू नका, गर्दी टाळा, प्रवास टाळा असे वारंवार आवाहन करत आहे. तरी सुद्धा अनेक जण दुचाकी, चारचाकी गाड्या घेऊन घराबाहेर पडत आहेत. अशावेळी सहकार्य करत नाही त्यांच्यावर लाठीचा वापर करा, असे आदेश गृहमंत्र्यांनी पोलिसांना दिले आहेत.