पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

राज्यात कोरोनाबाधितांचा आकडा ३३५ वर; ३३ नवे रुग्ण आढळले

कोरोना

राज्यात कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव वाढत चालला असून कोरोनाबाधितांच्या संख्येतही दिवसेंदिवस वाढ होत चालली आहे. महाराष्ट्रात कोरोनाचे आणखी ३३ नवे रुग्ण आढळले आहेत. त्यामुळे राज्यातील कोरोनाबाधितांचा आकडा ३३५ वर पोहचला आहे. राज्य आरोग्य विभागाने बुधवारी ही माहिती दिली आहे.

लॉकडाऊन: जीवनावश्यक वस्तूंचा काळाबाजार करणाऱ्यांवर कारवाईचे आदेश

राज्यात कोरोनाचा कहर सुरुच आहे. आज आलेल्या आकडेवारीनुसार कोरोनाचे ३३ नवे रुग्ण आढळले आहेत. यामध्ये ३० रुग्ण हे मुंबईतील आहेत. तर पुण्यातील २ रुग्ण आणि बुलढाण्याचा एक रुग्ण आहे. त्यामुळे राज्यातील एकुण कोरोनाबाधित रुग्णांची संख्या ३३५ झाली आहे, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली आहे. मुंबईमध्ये कोरोनाचे सर्वाधिक रुग्ण आहेत. तर दुपारीच आरोग्यमंत्र्यांनी राज्यातील कोरोनाबाधितांचा आकडा वाढण्याची शक्यता वर्तवली होती. 

कोरोनाबाधितांचा आकडा वाढला असला तरी तो नॅशनल ट्रेंड नाही, कारण...

तसंच, राज्यातील कोरोनाबाधितांच्या संपर्कात आलेल्यांची संख्या ५ हजार ३४३ झाली असून त्यांना विलगीकरण कक्षात ठेवण्यात आले आहे. तर मुंबईत कोरोनाचा वाढता संसर्ग लक्षात घेता मुंबईतील १९१ परिसर सील करण्यात आले असल्याची माहिती मुंबई महानगर पालिकेने दिली आहे. याठिकाणी पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. तसंच, सीसीटीव्हीच्या माध्यमातून लक्ष ठेवण्यात येत आहे.

'राज्यातील ५ हजारांपेक्षा अधिक जण 'हाय रिस्क कॉन्टॅक्ट'मध्ये'