पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

मिरजमधील शासकीय कोरोना रुग्णालयात अत्याधुनिक टेस्ट लॅब सुरु

कोरोना टेस्ट

सांगलीतील मिरज शासकीय कोरोना रुग्णालयामध्ये अत्याधुनिक टेस्ट लॅब सुरु झाली आहे. पहिल्याच दिवशी या लॅबमध्ये कोल्हापूर आणि सिंधुदुर्ग येथील २१ स्वॅब तपासणीसाठी आले असल्याची माहिती रुग्णालय प्रशासकीय अधिकारी डॉ. पल्लवी सापळे यांनी दिली. सांगलीच्या इस्लामपूरमध्ये कोरोनाची लागण झालेले २५ रुग्ण आढळले होते. त्यानंतर मिरजेचे शासकीय रुग्णालय कोरोना रुग्णालय म्हणून जाहीर करण्यात आले. आता या रुग्णालयात अत्याधुनिक यंत्रणांनी सुसज्ज अशी लॅब सुद्धा उभी करण्यात आली आहे. 

सर्वाधिक कोरोनाबाधित रुग्ण २१ ते ४० वयोगटात, आरोग्य मंत्रालय

मिरजेतील शासकीय रुग्णालयात लॅब सुरु झाल्यामुळे पश्चिम महाराष्ट्र आणि शेजारच्या कर्नाटक राज्याला याचा फायदा होणार आहे. सांगली, कोल्हापूर, सातारा, सिंधुदुर्ग, रत्नागिरी या ठिकाणी असलेल्या कोरोनाच्या संशयित रुग्णांच्या स्वॅब तपासणीसाठी पुणे येथील लॅबमध्ये पाठवण्यात येत होते. त्याठिकाणावरून अहवाल येण्यास २ दिवस जायचे. मात्र मिरजमध्येच लॅब सुरु झाल्यामुळे आता अहवाल लवकर उपलब्ध होण्यास मदत होणार आहे. 

लॉकडाऊनमधून राज्य टप्प्याटप्यातून बाहेर पडेल, राजेश टोपेंनी दिले संकेत

मिरज येथील कोरोना रुग्णालयाच्या ठिकाणी सर्व पद्धतीच्या सुसज्ज अशा यंत्रणा उपलब्ध असणारे देशातील हे पहिलेच कोरोना रुग्णालय असल्याचा दावा डॉ. पल्लवी सापळे यांनी केला आहे. दरम्यान, राज्यात कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव वाढत चालला असून दिवसेंदिवस रुग्णांच्या संख्येत वाढ होत चालली आहे. कोरोनाचा वाढता संसर्ग लक्षात घेता गुरुवारी सरकारने राज्यातील ३० शासकीय रुग्णालये 'कोविड १९ रुग्णालय' म्हणून घोषीत केली आहेत. 

जात, धर्म, भाषा, प्रांतवाद टाळून सर्वांनी योगदान द्यावं: अजित पवार