पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

कोरोनाविरोधातील लढाईसाठी साई संस्थानकडून ५१ कोटींची मदत

शिर्डीचे साईबाबा

राज्याला कोरोनाच्या संकटातून बाहेर काढण्यासाठी सरकारकडून सर्वोतपरी प्रयत्न सुरु आहेत. अशामध्ये कोरोनाविरोधातील लढाईसाठी शिर्डीचे साईबाबा संस्थान आणि पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समिती मदतीसाठी पुढे सरसावली आहे. साईबाबा संस्थानाकडून ५१ कोटींची तर पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीकडून २ कोटींची आर्थिक मदत मुख्‍यमंत्री सहाय्यता निधीस देण्‍याचा निर्णय घेण्यात आला आहे.

साईबाबा संस्‍थानचे मुख्‍य कार्यकारी अधिकारी अरुण डोंगरे यांनी सांगितले की, 'कोरोनाच्या संकटास तोंड देण्‍यासाठी केंद्र आणि राज्‍य सरकार सज्‍ज झाले आहे. याच पार्श्‍वभूमीवर साईबाबा संस्‍थान विश्‍वस्‍तव्‍यवस्‍थेच्‍या वतीने या संकटाचा सामना करण्‍यासाठी ५१ कोटी रुपयांचा निधी मुख्‍यमंत्री सहाय्यता निधीस देण्‍याचा निर्णय संस्‍थानच्‍या तदर्थ समितीने घेतला आहे.'

कोरोनाशी लढ्यासाठी सचिन आला धावून, सर्वात मोठी आर्थिक मदत

त्याचसोबत, साईप्रसादालयाच्‍या वतीने श्री साईबाबा हॉस्पिटल आणि श्री साईनाथ रुग्‍णालयातील रुग्‍ण आणि त्यांचे नातेवाईक, शिर्डी परिसरातील अनाथ आश्रम, वृध्‍दाश्रम, मुखबधीर विद्यालय, बंदोबस्‍तावरील पोलिस कर्मचा-यांना, शिर्डी बस स्‍थानकावरील निराधार व गरजुंना आणि संस्‍थानच्‍या व शासकीय कार्यालयातील सरंक्षण, स्‍वच्‍छता व इतर कार्यरत कर्मचा-यांना निशुल्‍क भोजन पुरविण्‍यात येणार आहे.

एकमेकांजवळ बसल्यास ६ महिने शिक्षा आणि दंड, ... या देशात नवा नियम

दरम्यान, पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीकडून कोरोनाविरोधातील लढाईसाठी मदत करण्याचा निर्णय घेतला आहे. पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीने दोन कोटींची मदत जाहीर केली आहे. मुख्यमंत्री सहायता निधीसाठी दीड कोटींची मदत दिली जाणार आहे. तर कोल्हापूर जिल्ह्यासाठी ५० लाखांची मदत दिली जाणार आहे. कोल्हापूर जिल्ह्याची मदत जिल्हाधिकाऱ्यांकडे सुपूर्द करण्यात येणार आहे. पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीचे अध्यक्ष महेश जाधव यांनी ही माहिती दिली आहे. 

पंढरपूरचा चैत्रीवारीचा सोहळा रद्द, महाराज मंडळींचा निर्णय

  • Marathi News: संबंधित इतर बातम्या वाचण्यासाठी आम्हाला लाईक करा आणि फॉलो करा.
  • Web Title:coronavirus shri saibaba sansthan trust has donated 51 crore to maharashtra chief ministers relief fund to fight the covid 19