पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

सरकारी कर्मचारी ऑन ड्युटी अन् लोकलही ऑन टाइम, पण...

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

बस आणि ट्रेन या अत्यावश्यक सेवा असून या सेवा बंद करण्याचा कोणताही निर्णय तुर्तास घेतलेला नाही, असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सांगितले. मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर त्यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. राज्यात आतापर्यंत ४० जणांना कोरोना विषाणूची लागण झाली असून यात २६ पुरुष आणि १४ महिलांचा समावेश असल्याची माहिती मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिली. यातील एका रुग्णाची परिस्थिती गंभीर असून बाकीच्या रुग्णांची प्रकृती स्थिर असल्याची माहितीही त्यांनी दिली.  

सरकारी कर्मचाऱ्यांना सुट्टी नाही, उद्धव ठाकरेंच स्पष्टीकरण

अनावश्यक प्रवास टाळा गर्दी ओसरली नाही तर बस आणि लोकल सेवा बंद करण्याचं पाऊल उचलावे लागेल, असेही उद्धव ठाकरे यांनी यावेळी सांगितले. सरकारी कर्मचाऱ्यांना कोणत्याही प्रकारची सुट्टी जाहीर करण्यात आलेली नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले. गर्दी टाळण्याच्या उद्देशाने कमीत कमी कर्मचाऱ्यांमध्ये काम सुरु ठेवण्यासंदर्भात विचार करत आहोत, असे उद्धव ठाकरे यांनी म्हटले आहे.  

पुण्यात कोरोनाचा आणखी एक रुग्ण, राज्यातील आकडा ४० वर

नागरिकांनी अनावश्यक प्रवास टाळा असे आवाहन त्यांनी पुन्हा एकदा केले. कोरोनाच्या संकटाचा सामना करण्यासाठी जनतेचे सहकार्य महत्त्वाचे आहे. पुण्यातील दुकानदारांप्रमाणे मुंबईतील दुकानदारांनी देखईल गांभिर्य लक्षात घेऊन  जीवनावश्यक वस्तूशिवाय अन्य दुकाने स्वताहून बंद करावी, असे आवाहनही त्यांनी केले. 

  • Marathi News: संबंधित इतर बातम्या वाचण्यासाठी आम्हाला लाईक करा आणि फॉलो करा.
  • Web Title: Coronavirus Public transport to remain open no closure of government offices Says Maharashtra CM Uddhav Thackeray