पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

कोरोना : मंत्रिमंडळाच्या बैठकीत या गोष्टींवर देण्यात आला भर

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मंत्रिमंळाची विशेष बैठक पार पडली.

राज्यात आतापर्यंत कोरोना विषाणूची लागण झालेले ४१ रुग्ण आढळले असून मंगळवारी मुंबईतील कस्तुरबा गांधी रुग्णालयात एका वृद्धाचा मृत्यू झाल्याचे समोर आले. राज्यातील कोरोना विषाणू बाधित रुग्णांमध्ये २८ पुरुष तर १३ महिलांचा समावेश आहे. कोरोना विषाणूच्या वाढत्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर मुंबईत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली बैठक पार पडली. यावेळी सरकारी कार्यलये तसेच सार्वजनिक वाहतकू सेवा सुरुच ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला. अनावश्यक गर्दी आणि प्रवास टाळण्याचे आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी बैठकीनंतर केले. 

मंत्रिमंडळाच्या बैठकीत झालेल्या चर्चेतील प्रमुख बाबी पुढील प्रमाणे  

- मंत्रालयासह सरकारी कार्यालये बंद करण्यात येणार नाहीत. मात्र, परिस्थितीचा सातत्याने आढावा घेण्यात येत असून याविषयी योग्य तो निर्णय वेळोवेळी घेण्यात येईल. 

- सध्या अत्यावश्यक नसलेल्या सेवांना सरकारने मर्यादित स्वरुपात काम करण्याबाबत सूचना केली आहे.   

-शहरातील विशेषत: क्रॉफर्ड मार्केट परिसरातील पक्षी व प्राण्यांशी संबंधित दुकाने संसर्गाचा धोका गृहित धरुन बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला. भाजीपाला दुकाने सुरुच राहतील, असेही सरकारने स्पष्ट केले आहे. 

-कोरोना प्रतिबंधासाठी प्रभावी उपाययोजनेचा एक महत्त्वाचा भाग म्हणून खासगी क्षेत्रातील कंपन्यांकडून वर्क फ्रॉम होम कार्यपद्धती मान्य करण्यात आली आहे. 

सरकारी कर्मचारी ऑन ड्युटी अन् लोकलही ऑन टाइम, पण...

- रेल्वे, बसेस ही सार्वजनिक वाहतूक बंद करण्यात येणार नाही.  मात्र, आवश्यक असेल तेव्हाच नागरिकांनी प्रवास करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. 

-औषधे, बँका, संस्थांचे व्यवस्थापन प्रमुख आणि आरोग्य क्षेत्रातील तज्ज्ञ यांच्याशी चर्चा झाली असून त्यांनी देखील संपूर्ण सहकार्य करण्याचे मान्य केले आहे. कंपन्यांच्या सीएसआर फंडातून औषधे, मास्क, सॅनिटायझर, व्हेन्टीलेटर पुरविणार. 

-गरज असल्यास व्हेंटिलेटर आणि अन्य उपकरणे स्थानिक बाजारातून खर्च करण्याचे जिल्हा प्रशासनाला अधिकार बहाल करण्यात आले आहेत. 
- कोरोनाचा संसर्ग टाळण्याकरिता गर्दी कमी करणे हा प्रभावी उपाय असून त्यासाठी आवश्यक तेवढा प्रवास करावा असे आवाहन नागरिकांना करण्यात आले आहे.

-खासगी व्यतिरिक्त इतर सरकारी तसेच निमशासकीय कार्यालयातून नियमित काम सुरुच राहील. मात्र, या ठिकाणी काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना देखील आरोग्याची पुरेशी काळजी घेण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. 

-सध्या परदेशातून येणाऱ्या प्रवाशांची विमानतळ आणि बंदरांवर कसून तपासणी सुरु असून विलगीकरणाची व्यवस्था देखील पुरेशी आहे. 

-प्रसंगी शहरातील मोठ्या हॉटेल्समध्ये कमी दरात विलगीकरण सुविधाही उपलब्ध करुन देण्यात आली आहे. 

-कोरोनाच्या रुग्णावर खासगी रुग्णालयात देखील उपचार करण्यासाठी राज्य सरकारची परवानगी.

-सर्व धर्मियांच्या प्रार्थनास्थळांवर नियमित पूजा-अर्चा सुरु ठेवून भाविकांची गर्दी मात्र थांबविण्याचे आदेश

- राज्यात लागू असलेला साथरोग प्रतिबंध कायदा जनतेच्या हितासाठी असून त्यांच्यात जागृती आणण्यासाठी जिल्हा प्रशासनाने मोहिमा हाती घ्याव्यात. जे रुग्ण पॉझिटिव्ह आढळले त्यांच्यासाठी मानसिक आधार देण्याची आवश्यकता असून क्वॉरंटाईन केलेल्या ठिकाणी त्यांना आवश्यक त्या सुविधा उपलब्ध करुन द्याव्यात

कोरोनामुळे मध्य रेल्वेने २३ लांबपल्ल्यांच्या गाड्या केल्या रद्द

-ज्या नागरिकांना होम क्वॉरंटाईन सांगितले आहे त्यांनी स्वत:हूनच घरी राहून स्वत:बरोबरच इतरांचीही काळजी घ्यावी. 

-ग्रामीण भागातील शाळा बंद करतानाच सार्वजनिक स्वच्छतागृह या ठिकाणी सॅनिटायझर, साबण आणि पाणी उपलब्ध राहील यांची दक्षता घ्यावी.

-केंद्र शासनाने ज्या सात देशांचा प्रवास करुन आलेल्यांना सक्तीचे क्वॉरंटाईन करण्याच्या सूचना केल्या आहेत. त्यामध्ये राज्य सरकारकडून दुबई, सौदी अरेबिया आणि अमेरिका यांचाही समावेश करण्यात आला आहे.

  • Marathi News: संबंधित इतर बातम्या वाचण्यासाठी आम्हाला लाईक करा आणि फॉलो करा.
  • Web Title:Coronavirus Next 15 20 days are very crucial for us CM Uddhav Thackeray Discussed On Latest Situation Coronavirus In State See All Points