पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

तुमचे कौतुक करायला शब्द अपुरे, आरोग्यमंत्र्यांचे भावनिक पत्र

आरोग्यमंत्र्यांकडून डॉक्टरांचे कौतुक

कोरोनाविरोधातील लढाईमध्ये जीवाची बाजी लावून लढणाऱ्या राज्यातील डॉक्टर्स, नर्स आणि आरोग्य कर्मचाऱ्यांचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी पत्राद्वारे आभार मानत त्यांचे कौतुक केले आहे. कोरोनाविरोधातील लढाईमध्ये डॉक्टर आणि कर्मचारी आघाडीचे सैनिक असल्याची उपमा त्यांनी दिली आहे. तुमचे कौतुक करण्यासाठी माझ्याकडे शब्द अपुरे आहेत. मात्र या लढाईमध्ये तुम्ही सुद्धा आपल्या प्रकृतीची काळजी घ्या, असे आवाहन आरोग्यमंत्र्यांनी केले आहे. 

पंतप्रधान मोदी उद्या सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांशी बोलणार

राजेश टोपे यांनी आरोग्य कर्मचाऱ्यांसाठी लिहिलेल्या पत्रात असे म्हटले आहे की, 'कोरोनाचे जगभरात थैमान सुरू असताना मार्चच्या पहिल्या आठवड्यात या विषाणूचा आपल्या राज्यात शिरकाव झाला आणि तेव्हापासून आपण मंडळी जीवाची पर्वा न करता रुग्णांची सेवा करताय. तुमच्या या कार्याला सलाम. तुमच्या तत्पर सेवेमुळे आणि अविरत मेहनतीमुळे आतापर्यंत राज्यातील ३९ कोरोना रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. यात तुमचा सिंहाचा वाटा आहे. त्याबद्दल आपणा सर्वांचे अभिनंदन व आभार!'

सुब्रमण्यम स्वामींचा घरचा आहेर, १ फेब्रुवारीपासून बंदी का घातली नाही?

कोरोनाचा शिरकाव सुरू झाल्यापासून आपण सर्वप्रथम त्याला सामोरे गेला आहात. सर्वात आधी तुम्ही मंडळींनी या युद्धाला सामोरे जाण्यासाठी नेतृत्व केले. त्याचप्रमाणे एखाद्या लढाईत आघाडीवरचा सैनिक झोकून देऊन नेटाने बाजी लढवत असतो तसे तुम्ही आतापर्यंत धीराने कोरोना विरुद्धलढता आहात. समाजाच्या सेवेसाठी हे अतुलनीय शौर्य तुम्ही गेल्या कित्येक दिवसांपासून न थकता दाखवत आहात. हे अभिनंदनीय आहे, असे राजेश टोपे यांनी म्हटले आहे. 

जम्मू-काश्मिरच्या डोमिसाईल नियमात बदल, १५ वर्षे रहिवासाची अट

तसंच, तुम्ही दाखवत असलेल्या धीरामुळे रुग्णांना तर मानसिक बळ मिळतेच परंतु आम्हालाही त्यामुळे काम करण्याचे पाठबळ आणि प्रोत्साहन मिळत असल्याचे आरोग्यमंत्र्यांनी सांगितले. समस्त देशवासिय आपापल्या घरात कुटुंबियांसमवेत असताना आपण मात्र कर्तव्य भावनेतून कुटुंबापासून, आप्तस्वकीयांपासून दूर जात, सेवाभाव जपत आहात. खरं तर आपलं कौतुक करायला माझ्याकडे शब्द अपुरे पडत आहेत, असे त्यांनी सांगितले. 

SBI, PNB चा ग्राहकांना मोठा दिलासा, तीन महिने हप्त्यांची वसुली नाही

आरोग्यमंत्र्यांनी पुढे असे सांगितले की, 'कोरोनाला हरविण्यासाठी आपली लढाई अशीच सुरू ठेवू या. ‘मीच माझा रक्षक’ हा संदेश आपण सर्वसामान्यांना दिला आहे. आपणही आपल्या प्रकृतीची काळजी घ्या, असा आपुलकीचा सल्ला देतानाच आपल्या काही सूचना असतील तर माझ्यापर्यंत जरूर पोहोचवा, असे आवाहनही त्यांनी केले आहे. 

लॉकडाऊन : बेजबाबदारपणे वागणाऱ्यांची आता खैर नाही, अजित पवारांचा इशारा