पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

कोरोनामुळे राज्यावर अर्थसंकट, बेरोजगारीचं प्रमाण वाढणार: शरद पवार

शरद पवार

कोरोनामुळे राज्यावर अर्थसंकट आहे. कोरोनाचा परिणाम पुढचे दोन वर्ष राहू शकतो. भविष्यात बेरोजगारीचे प्रमाण वाढणार आहे. हे संकट मोठं आहे त्यामुळे आतापासून उपाययोजना करण्याची गरज आहे. त्यासाठी सरकार प्रयत्न करत आहे. आपणही यासाठी तयार झाले पाहिजे, असे आवान राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी केले आहे. फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून त्यांनी आज जनतेशी संवाद साधला. 

पंतप्रधान मोदी २६ एप्रिलला 'मन की बात'मधून जनतेशी साधणार संवाद

शरद पवार यांनी सांगितले की, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर असलेल्या लॉकडाऊनचे आर्थिक परिणाम दिसून येत आहेत. उत्पादनाची साखळी ठप्प झाली आहेत. उद्योग आणि इतर क्षेत्रातही आर्थिक अडचण आली आहे. त्यामुळे येणाऱ्या काळात याचे वपरित परिणाम जाणवू लागणार आहेत. तसंच, सरकार योग्य नियोजन करत आहे. कोरोनाचा धीराने सामना करा. पाश्चिमात्य देशाच्या तुलनेत आपल्याकडे कोरोनाची बाधा कमी असल्याचे त्यांनी सांगितले. 

अफवांवर विश्वास ठेवू नका, विशेष रेल्वे सोडणार नाही: रेल्वे मंत्रालय

वांद्रे स्टेशनजवळ घडलेला प्रसंग दुर्दैवी आहे. कुणीतरी रेल्वेबाबत अफवा पसरवली, असल्याचे पवारांनी सांगितले. राज्यातील स्थलांतरिक कर्मचाऱ्यांना प्रवासाची सुविधा उपलब्ध करु शकत नाही. पण त्यांना दोन वेळचे जेवण, राहण्याची सुविधा देण्याची खबरदारी अनेकांनी घेतली आहे. त्यामुळे उपासमार टळली आहे, असल्याचे त्यांनी सांगितले. 

कोरोना विषाणूः डोनाल्ड ट्रम्प यांनी डब्ल्यूएचओचा निधी रोखला
 
दरम्यान, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जी उपाययोजना करायची आहे, ती सगळी पावलं सरकारकडून टाकली जात आहेत. वैद्यकीय खबरदारी घेतली जातेय, अन्न-धान्याची पूर्तता, कष्टकरी-कामगार वर्ग यांची काळजी घेतली जात आहे, असे शरद पवारांनी सांगितले. यावेळी त्यांनी सर्व राजकीय पक्षांना आवाहन केले आहे की, राजकारण लोकशाहीत चालते पण ही वेळ नाही. देशावर संकट आहे. प्रशासनावर ताण आहे. पक्ष विसरुन सरकारला मदत करा.

वांद्रे गर्दी प्रकरण: उत्तर भारतीय महापंचायतीचा अध्यक्ष विनय दुबेला अटक