पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

धक्कादायक! बारामतीत लॉकडाऊन दरम्यान १० पोलिसांना मारहाण

बारामतीत पोलिसांना मारहाण

कोरोना विषाणूच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे संपूर्ण देशात लॉकडाऊन आहे. या लॉकडाऊनच्या काळात जनतेच्या सुरक्षेसाठी तैनात असलेल्या पोलिसांना मारहाण केल्याची धक्कादायक घटना उपमुख्यमंत्र्यांच्या बारामतीत घडली आहे. शुक्रवारी सायंकाळी बारामती शहरातील जळोची गावात आणि काटेवाडी येथे १० पोलिसांना मारहाण केल्याची घटना घडली. या हल्लामध्ये पोलिस जखमी झाले आहेत. 

रेल्वेगाड्यातही विलगीकरण कक्ष तयार, कोचमध्ये अनेक बदल

बारामतीच्या जलोची गावामध्ये मुंबई आणि पुण्यावरुन अनेक नागरिक आले आहेत. प्रशासनाने खबरदारी म्हणून त्यांना होम क्वारंटाइनचे आदेश दिले आहेत. असे असताना ते इकडे तिकडे फिरत होते. त्यांना समजावणाऱ्या एका तरुणाला त्यांनी मारहाण केली. त्यामुळे घटनास्थळी चौकशीसाठी पोलिस दाखल झाले. यावेळी आरोपींनी पोलिसांवर दगडफेक करत त्यांना मारहाण केली. या घटनेमध्ये तीन पोलिस अधिकाऱ्यांसह ६ पोलिस कर्मचारी जखमी झाले आहेत. या घटनेनंतर पोलिसांनी मारहाण करणाऱ्या चार जणांविरोधात गुन्हा दाखल करत त्यांना अटक केली.

अवघ्या पाच मिनिटांत कोरोनाची चाचणी, अमेरिकेत तंत्रज्ञान विकसित

तर, दुसरी घटना बारामतीतील काटेवाडी येथे घडली आहे. काटेवाडी येथे क्रिकेट खेळणाऱ्या एका तरुणाने पोलिस कर्मचाऱ्याच्या डोक्यात स्टंप घातला. यामध्ये पोलिस कर्मचारी जखमी झाला आहे. महत्वाचे म्हणजे दोन दिवसांपूर्वीच उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी लॉकडाऊनच्या काळात पोलिस कर्मचारी आणि डॉक्टरांवर हल्ला करणाऱ्यांविरोधात कठोर कारवाई करा, असे आदेश दिले होते. त्यानंतर त्यांच्याच बारामतीमध्ये ही घटना घडल्यामुळे संताप व्यक्त केला जात आहे. 

फेसबुक न वापरणाऱ्यांनाही FB Live ऐकता येणार, नवे फिचर