पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

दिलासादायक! इस्लामपूरचे पहिले ४ रुग्ण कोरोनामुक्त

कोरोना विषाणू

राज्यात कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव वाढत चालला असून दिवसेंदिवस रुग्णांच्या संख्येत वाढ होत चालली आहे. अशामध्ये सांगलीतून एक दिलासादायक माहिती समोर आली आहे. इस्लामपूरचे पहिले ४ कोरोनाबाधित रुग्ण बरे झाले आहेत. शनिवारी त्यांची दुसरी तपासणी करण्यात आली होती. हा तपासणी अहवाल निगेटिव्ह आला आहे, अशी माहिती सांगलीचे पालकमंत्री जयंतराव पाटील यांनी दिली आहे.

देशातील काही भागात कोरोना तिसऱ्या टप्प्यातः एम्स संचालक

सौदी अरेबिया इथून (उमराह) देवदर्शन करून इस्लामपूर येथील चौघे जण १४ मार्च रोजी आपल्या गावी परतले होते. त्यानंतर कोरोनाच्या पार्श्वभूमीवर १९ मार्च रोजी त्यांना प्रशासनाने ताब्यात घेऊन मिरजेच्या विलगीकरण कक्षात दाखल केले होते. त्याठिकाणी त्यांची तपासणी करण्यात आली असता त्यांना कोरोनाची लागण झाल्याचे समोर आले होते. त्यानंतर त्यांच्या संपर्कात आलेल्या त्यांच्या जवळच्या २२ नातेवाईकांनाही कोरोना लागण झाल्याचे समोर आले होते. 

कोविड-१९ : केजरीवाल सरकारवर 'गंभीर' आरोप

या सर्वांना मिरज रुग्णालयातील विलगीकरण कक्षात दाखल करण्यात आले होते. यापैकी पहिल्या ४ कोरोनाबाधित रुग्णांची तपासणी करण्यात आली. पहिला तपासणी अहवाल निगेटिव्ह आला. त्यानंतर शनिवारी पुन्हा त्यांची तपासणी करण्यात आली. दुसरा तपासणी अहवाल देखील निगेटिव्ह आला. त्यामुळे आता सांगलीमध्ये कोरोनाबाधितांचा आकडा २१ झाला आहे. या सर्वांवर उपचार सुरु असून १४ दिवसांनंतर त्यांची तपासणी करण्यात येणार आहे. 

कोरोना संशयित नागरिकांनी लपून न राहता पुढे यावे, अजित पवारांचे आवाहन