पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

सांगलीत एकाच कुटुंबातील ५ जण कोरोनाग्रस्त, राज्याचा आकडा ११२ वर

संग्रहित छायाचित्र

सांगली जिल्ह्यातील इस्लामपूरमध्ये एकाच कुटुंबातील पाच जणांना कोरोनाची लागण झाल्याचे स्पष्ट झाले आहे. या पाचही जणांचा चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. या नव्या पाच रुग्णांमुळे राज्यातील कोरोनाग्रस्त रुग्णांच्या संख्येने ११२ चा आकडा गाठला आहे. मंगळवारी राज्यातील कोरोनाग्रस्त रुग्णांची संख्या १०७ इतकी होती. त्यात आज आणखी पाच जणांची भर पडली आहे. या पाच रुग्णांमुळे सांगलीतील आकडाही ९ इतका झाला आहे. 

कोरोना : सांगलीकरांना मिळणार जीवनावश्यक वस्तूंची घरपोच सेवा

इस्लामपूरमध्ये यापूर्वी जे ४ रुग्ण आढळले होते. त्यांच्या संपर्कात आल्याने या रुग्णांना कोरोना विषाणूची लागण झाल्याचे सांगण्यात येते. यापूर्वीचे रुग्ण हे सौदी अरेबियातून आले होते. राज्यातील वाढते रुग्ण पाहता राज्य सरकारने आणखी नवे प्रतिबंध लागू केले आहेत. 

विदेशात न गेलेल्या तामिळनाडूतील व्यक्तीचा कोरोनाने मृत्यू

राज्यातील स्थिती अशी
पिंपरी-चिंचवड १२ रुग्ण (मृत्यू ०), पुणे १८ रुग्ण (मृत्यू ०), मुंबई ४१ रुग्ण (मृत्यू ४), नवी मुंबई, कल्याण-डोंबिवली ५ रुग्ण (मृत्यू ०), नागपूर, यवतमाळ प्रत्येकी चार, सांगली ९ रुग्ण (मृत्यू ०), अहमदनगर, ठाणे प्रत्येकी ०३ रुग्ण (मृत्यू ०), सातारा २ रुग्ण (मृत्यू ०), पनवेल, उल्हासनगर, औरंगाबाद प्रत्येकी १ रुग्ण (मृत्यू ०), एकूण ११२ रुग्ण (मृत्यू ४)